Upsc Interview 10 Questions : असा कोणता जीव आहे, जो आपले पाय चालण्यासाठी नव्हे, तर झोपण्यासाठी वापरतो ?
शेतीशिवार टीम, 28 डिसेंबर 2021 : UPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा आहे. जे उत्तीर्ण होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते.आणि जो या परीक्षेत उत्तीर्ण होतो तो देशाचा (IAS) अधिकारी होतो. या परीक्षेचे एकूण तीन टप्पे आहेत. ज्यामध्ये लेखी बरोबर इंटरव्हिव्ह हि घेतला जातो. प्रत्येकजण लेखी परीक्षा पास तर होतो पण इंटरव्हिव्ह मध्ये अडकतात.
खरं तर असे अनेक प्रश्न या UPSC इंटरव्यू दरम्यान विचारले जातात. ज्याची उत्तरे प्रत्येकाच्या डोक्यात बसत नाहीत. हे प्रश्न खूप गुंतागुंतीचे आणि गुंफलेले असतात. भल्याभल्यांचं मन हेलावतं. तर आज आम्ही या पोस्टमध्ये तुमच्यासाठी असेच काही प्रश्न घेऊन आलो आहोत जे तुम्हाला इंटरव्हिव्ह मध्ये खूप मदत करू शकतात.
प्रश्न – केस किती वेगाने वाढतात ?
उत्तर – केस दर महिन्याला अर्धा इंच वाढतात.
प्रश्न – असं कोणतं गेट आहे त्या गेटमध्ये आपण प्रवेश करू शकत नाही ?
उत्तर – कोलगेट
प्रश्न – डास ( मच्छर) किती उंचीवर उडू शकतो ?
उत्तर- एक डास सुमारे 50 फुटांपर्यंत उडू शकतो.
प्रश्न- SD कार्डमध्ये किती सोनं वापरले जाते ?
उत्तर- सोने हे खूप चांगलं कंडक्टर आहे. जे आपला डेटा आणि ट्रान्सफर स्पीड वाढवतं. यामुळेच SD कार्डमध्ये सोन्याच्या धाग्यासारखी तार वापरली जाते. स्टॅंडर्ड आकाराच्या मेमरी कार्डमध्ये सुमारे 10 ते 12 पैशांचं सोनं असतं.
प्रश्न – कोणत्या ब्लड ला गोल्डन ब्लड असं म्हटलं जातं ?
उत्तर – Rhmull ब्लड हे जगातील सर्वात दुर्मिळ ब्लड आहे. जो करोडो लोकांमधील एका व्यक्तीमध्ये आढळतं. या रक्तगटाला गोल्डन ब्लड ग्रुप असं म्हणतात.
प्रश्न- जगातील सर्वात उंच रस्ता कुठे आहे ?
उत्तर- मनाली – लेह रस्ता हा जगातील सर्वात उंच रस्ता आहे.
प्रश्न – असा कोणता पक्षी आहे जो मांस खात नाही ?
उत्तर – पोपट
प्रश्न – दारू पिल्यानंतर माणसं नशेत धुंद का होतात ?
उत्तर – जर्मनीतील एका विद्यापीठाच्या संशोधनानुसार, अल्कोहोल हे धान्य, ऊस, विविध फळे ( सफरचंद,संत्रा, बेरी, इ.) किंवा काही फळभाज्या आंबवून तयार केलेलं रंगहीन द्रव तयार केलं जातं. या प्रक्रियेत तयार होणाऱ्या रसायनाला इथेनॉल म्हटलं जातं.
या अल्कोहोल मध्ये जे रेणू घटक असतात ते खूप लहान असतात, ते आपल्या रक्तात खूप लवकर विरघळतात. दारू पिल्यानंतर अल्कोहोल आतड्यांमधून रक्तप्रवाहात प्रवेश करून ते शरीराच्या सर्व भागांमधून वेगात पसरत अन् फक्त 6 मिनिटात ते आपल्या मेंदूपर्यंत पोहचल्याने मेंदूचा ताबा सुटतो अन् आपलं शरीरावरील नियंत्रण हळूहळू कमी होऊ लागतं.
प्रश्न – न झोपता आपण किती दिवस जिवंत राहू शकतो ?
उत्तर – आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी झोप खूप महत्त्वाची आहे. जेवणाविना आपण 2 महिने जगू शकतो. आणि पाण्याविना आपण एक आठवडा ते 10 दिवसापर्यंत जगू शकतो. तस न झोपता आपण जास्तीत जास्त 12 दिवस जगू शकतो…
प्रश्न – असा कोणता जीव आहे, जो आपले पाय चालण्यासाठी नव्हे, तर झोपण्यासाठी वापरतो ?
उत्तर – वटवाघुळ