शेतीशिवार टीम, 28 डिसेंबर 2021 : EKI एनर्जी सर्व्हिसेसच्या (EKI Energy Services) स्टॉकने गेल्या 9 महिन्यांत 5,734 % रिटर्न्स दिले आहे. हा स्टॉक 7 एप्रिल 2021 रोजी 140 रुपयांवर होता, आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर हा 8,168.20 रुपयांवर पोहोचला आहे.
काही सत्रात 5% च्या वरच्या सर्किटमध्ये अडकल्यानंतर, स्टॉक बीएसईवर (BSE) त्याच्या मागील बंदच्या 7,779.25 च्या तुलनेत 5% वाढून 8,168.20 वर बंद झाला. या वर्षी एप्रिलमध्ये हा शेअर बीएसईवर (BSE) रु. 102 वर लिस्ट झाला होता.
गुंतवणूकदारांना झाला लाखोंचा फायदा :-
जर एखाद्याने 9 महिन्यांपूर्वी EKI एनर्जी सर्व्हिसेस स्टॉकमध्ये (EKI Energy Services) 1 लाख रुपये गुंतवले असते तर ते आज रु. 58.34 लाख झाले असते. या कालावधीत सेन्सेक्स 2,614 अंकांनी किंवा 5.26 टक्क्यांनी वाढला आहे.
काल सकाळी 9:52 वाजता, बीएसईवर (BSE) 5 टक्क्यांच्या वरच्या सर्किटवरून शेअर 8,168 रुपयांवर पोहोचला. फर्मचे मार्केट कॅप 5,614.82 कोटी रुपये होते. EKI एनर्जी सर्व्हिसेसचा शेयर्स सहा महिन्यांत 1,134 टक्क्यांनी वाढला आहे. शेअर 4.12 टक्क्यांच्या वाढीसह 8,100 रुपयांवर उघडला.
काय आहे, कंपनीचा बिझिनेस ?
कंपनी हवामान बदल सल्लागार (Climate change advisory), कार्बन क्रेडिट ट्रेडिंग, बिझिनेस अँक्सीलेंस अँडव्हायजरी आणि इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिटमध्ये सेवा प्रदान करते. परंतु कंपनीचा मुख्य व्यवसाय कार्बन क्रेडिटचा व्यापार करणे आहे. भारताचा कार्बन बाजार हा जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांपैकी एक आहे आणि त्याने लाखो कार्बन क्रेडिट्स निर्माण केले आहेत.
जेव्हा EKI एनर्जी सर्व्हिसचा शेअर त्याच वर्षी म्हणजेच एप्रिल 2021 मध्ये लिस्ट झाला होता, तेव्हा या स्टॉकची मार्केट कॅप फक्त 18 कोटी रुपये होती. हेच मार्केट कॅप आता 5093 कोटी रुपये झाले आहे.
ही कंपनी मार्च 2021 पर्यंत पूर्णपणे कर्जमुक्त कंपनी आहे. कंपनीमध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी 73.5% आहे.