शेतीशिवार टीम, 28 डिसेंबर 2021 : इलेक्ट्रिक वाहन निर्माता शेमा इलेक्ट्रिक व्हेईकल अँड सोलर प्रायव्हेट लिमिटेड (SES) ने EV India Expo 2021 मध्ये दोन नवीन इलेक्ट्रिक बाईक सादर केल्या आहेत.
SES TUFF ही हाय-स्पीड इलेक्ट्रिक बाईक आहे, तर SES HOBBY ही कमी-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर आहे. विशेष बाब म्हणजे यामध्ये ग्राहकांना फुल चार्जमध्ये जवळपास 150 Km पर्यंतची रेंज मिळणार आहे, तर अवघ्या 4 तासात बॅटरी चार्ज होणार आहे.
SES TUFF :
कंपनीने ही हायस्पीड इलेक्ट्रिक बाइक B2B सेगमेंटसाठी सादर केली आहे. मल्टी युटिलिटी इलेक्ट्रिक बाइकची लोडिंग क्षमता 150 किलो आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, यामध्ये तुम्हाला 150 किमीच्या रेंजसह 60 kmph चा स्पीड दिला जाईल. इलेक्ट्रिक बाइकमध्ये ड्युअल 60V, 30 Ah लिथियम डिटेचेबल बॅटरी आहे.
SES HOBBY :
कंपनीचे दुसरं प्रॉडक्ट 100% मेड इन इंडिया इलेक्ट्रिक स्कूटर आहे. हे एका चार्जवर 25 किमी प्रतितास वेगाने 100 किमी पर्यंत रेंज देते. इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ड्युअल 60V, 30 Ah लिथियम डिटेचेबल बॅटरी आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 4 तास लागतात.
सध्या शेमा इलेक्ट्रिक एकूण चार उत्पादनांची विक्री करत आहे. त्याचे 75 डीलर्सचे नेटवर्क आहे जे 13 राज्यांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, पुढील सहा महिन्यांत महाराष्ट्र राजस्थान, पंजाब, हरियाणा, केरळ, कर्नाटक आणि गुजरातसारख्या प्रमुख बाजारपेठांमध्ये आपले नेटवर्क विस्तारण्याची योजना आहे.