शेतीशिवार टीम,19 डिसेंबर 2021:- हिवाळ्यात,बऱ्याच लोकांना अनेकदा हात आणि पायांना मुंग्या (Tingling in hand and feet) आल्यासारखे जाणवते. कधीकधी याच कारण म्हणजे पायांना सुस्ती असं काही वाटतं आणि त्याचवेळी पाय आपटला कि तात्पुरता करंट लागल्यासारखं होतं . 

ही जरी गंभीर समस्या नसली तरी वैद्यकीय भाषेत याला ‘पॅरेस्थेसिया’ (Paraesthesia) असं म्हणतात. याचा परिणाम तुमचे पाय,बोटे, हात आणि तळवे अशा प्रभावित जागेवर होतो .असे का होते माहीत आहे का?

चला तर मग सविस्तर जाणून घेऊया..

हात आणि पाय मुंग्या येण्यामागचं कारणे ( tingling in hand and feet causes ) :-

1- अनेक वेळा शरीराला दीर्घकाळ एकाच अवस्थेत ठेवल्याने असे होऊ शकतं.
2- कंबरेच्या किंवा मानेच्या शिरामध्ये दुखापतीमुळे असे होऊ शकतं.
3- सांधेदुखीमुळेही हि समस्या उद्भवू शकतात.
4- शरीरात पोटॅशियम आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे समस्या असू शकते.
5- शरीरात व्हिटॅमिन्स कमतरता असल्यामुळे ही समस्या उद्भवू शकते.

6- हे काही औषधांमुळे देखील होऊ शकतं.
७- शरीरातील नसांवर जास्त दाब पडल्यामुळेही असं होतं.
8- एखाद्या प्राण्याच्या चावण्यामुळे देखील होतं.
9- धूम्रपान आणि जास्त मद्यपान केल्यामुळे देखील हि समस्यां होते.
10- कोमोथेरेपी दरम्यान देखील होऊ शकते.
काही वेळा मायग्रेन, मधुमेह, मिर्गी, थायरॉईड किंवा स्ट्रोक मुळेही हात-पाय मुंग्या येण्याची समस्या जाणवते.

हात आणि पाय मुंग्या येण्याची लक्षणे :-

हात आणि पाय मुंग्या येण्यावेळी काहीतरी टोचल्यासाखं वाटेल.
शरीराचा कोणताही भाग सुन्न होईल.
शरीरात अशक्तपणा आणि थकवा जाणवेल.
शरीर थंड होऊ शकते.
यासोबतच हात-पायांमध्ये मुंग्या येणे हे त्याचे प्रमुख लक्षण आहे.

हात आणि पाय मध्ये मुंग्या रोखण्यास उपचार :-

सर्व प्रथम, आपल्याला आपल्या हात आणि पायांना मुंग्या येणे कशामुळे होत आहे ते शोधणे आवश्यक आहे. शरीरात कोणत्याही व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे असे होत असेल, तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट घ्या.

जर ही समस्या काही संसर्गामुळे होत असेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही औषधामुळे असे होत असेल तर डॉक्टरांनाही सांगा. तुमची ब्लड शुगर लेव्हल आणि ब्लड प्रेशर देखील तपासत राहा. तुमच्या पपॉश्चर आणि दिनचर्येची देखील विशेष काळजी घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *