Take a fresh look at your lifestyle.

Share Market Tips : 9 रुपयांचा ‘हा’ स्टॉक फक्त 3 महिन्यांत देऊ शकतो 45% हुन अधिक रिटर्न्स

0

शेतीशिवार टीम,19 डिसेंबर 2021:- Investment Tips : शेअर मार्केट हे एक असं ठिकाण आहे, जिथं लोक एक रुपयांचे 4 रुपये करतात. तुमच्याकडं जर समजूतदारपणा आणि धैर्य असेल तर तुम्ही नक्कीच चांगली कामगिरी करू शकता. अशाच एका शेयर्सबद्दल आपण जाणून घेणार आहोत त्यामध्ये गुंतवणूक केल्यास कमी वेळात चांगले रिटर्न्स मिळू शकतात.

शेयर्स मार्केटचे दिग्गज राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये अशा स्टॉकचा समावेश आहे ज्यामध्ये सध्या चांगली वाढ होताना दिसत आहे. तो स्टॉक म्हणजे प्रोझोन इंटू प्रॉपर्टीज (Prozone Intu Properties). हा असाच एक स्मॉलकॅप स्टॉक आहे जो गेल्या 6 महिन्यांत 30 % नी तुटला आहे परंतु आता त्यात तेजी दिसत आहे.

राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओवर ठेवा लक्ष :-

जर आपण प्रोझोन इंटू प्रॉपर्टीजमधील (Prozone Intu Properties). राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओवर नजर टाकली तर, सप्टेंबर 2021 च्या तिमाहीत, राकेश झुनझुनवाला यांचा त्यात 31.50 लाख म्हणजे 2.06% हिस्सा होता.

गेल्या एका महिन्यात प्रोझोन इंटू प्रॉपर्टीजच्या (Prozone Intu Properties) स्टॉकमध्ये सुमारे 7.5 % वाढ झाली आहे. राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील या स्टॉकला बाउन्सबॅक दिसू शकतो, असे बाजारातील तज्ज्ञांचं मत आहे.

शानदार रिटर्न्सची आहे अपेक्षा :-

तज्ञांचे म्हणणं आहे की, कमी किमतीच्या स्टॉकमध्ये पुढील 3 महिन्यांत मजबूत वाढ अपेक्षित आहे. येत्या 2-3 महिन्यांत हा शेअर 42 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सध्या हा शेअर रु.29 च्या आसपास ट्रेंड करत आहे.

चॉईस ब्रोकिंगचे सुमीत बगडिया यांचं म्हणणं आहे की, ,प्रोझोन इंटू प्रॉपर्टीजचा स्टॉक (Prozone Intu Properties) 26 ते 30 रुपयांच्या दरम्यान व्यवहार करतआहे. असा अंदाज आहे की, या स्टॉकमध्ये 32 रुपयांच्या आसपास ब्रेकआउट दिसून येईल आणि एकदा ही पातळी ओलांडली की तो 36 रुपये आणि नंतर 42 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.