शेतीशिवार टीम,18 डिसेंबर 2021 :- हृदयविकाराचा झटका ही एक जीवघेणी टिकना आहे जी हृदयामध्ये होणारा रक्तप्रवाहात व्यत्यय निर्माण करत असते.हृदयविकाराचा झटका ही सामान्यतः जास्त प्रमाणात पुरुषांची समस्या म्हणून पाहिली जाते.डब्ल्यूएचओ(WHO)च्या मते, युनायटेड स्टेट्समधील पुरुष आणि स्त्रिया दोघांच्या मृत्यूचे हे सर्वात सामान्य कारण बनले आहे.
पण जरी,आकडेवारी पहिली तर, पुरुषांपेक्षा स्त्रियांना हृदयविकाराच्या झटका म्हणजेच (Heart attack) पासून बचावाची शक्यता कमी असते. याचे कारण महिलांमध्ये हृदयविकाराची काही लक्षणे पुरुषांपेक्षा वेगळी (Symptoms of heart attack) असू शकतात. स्त्रियांना “साइलेंट” हार्ट अटॅक येण्याची किंवा असामान्य लक्षणे दिसण्याची शक्यता असते.
हृदयविकाराचा झटका (Heart attack)अचानक येतो असं आपल्याला वाटतं , पण तसं नाही. 2013 च्या अभ्यासानुसार,पुरुष्यांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे एक महिन्यापूर्वी दिसू लागतात. परंतु ते इतके सामान्य लक्षणे असतात की ते लक्षात घेणे कठीण असतं, विशेषत: स्त्रियांमध्ये थोडे वेगळे असतात. चला तर मग जाणून घेऊया…
म्हणूनच आम्ही सांगत आहोत हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे जी प्रत्येक स्त्रीला माहित असणे आवश्यक आहे.
1.छातीत दुखणे (Chest Pain) :-
स्त्रिया आणि पुरुष दोघांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे छातीत दुखणे किंवा अस्वस्थता जाणवणे.
हे असे वर्णन केले जाऊ शकते:
1) छातीत ताण पडल्यासारखं जाणवणे.
2) दबाव आल्यासारखं होणं.
3) संकुचित झाल्याची भावना होणे.
4) वेदना होणे.
पण तरी सुद्धा,छातीत अस्वस्थता न येता महिलांना हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. 2003 च्या अभ्यासात, 29.7 टक्के महिलांनी हल्ल्याच्या आधीच्या आठवड्यात छातीत अस्वस्थता अनुभवली. तसेच 57 टक्के लोकांना हृदयविकाराच्या वेळी छातीत दुखत होते.
2.अत्यंत थकवा जाणवणे (Extreme Tiredness) :-
हृदयविकाराचा झटका येण्यापर्यंतच्या आठवड्यात अनेकदा थकवा जाणवतो. घटना घडण्याआधी तीव्र थकवा देखील येतो. अगदी साध्या क्रिया करताना सुद्धा
तसेच ज्यांना जास्त परिश्रम आवश्यकता नाहीत त्यांना देखील थकवा जाणवतो.
3.अशक्तपणा (Weakness) :-
अशक्तपणा किंवा अंग थरथरणे हे स्त्रीमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे एक सामान्य लक्षण आहे. हे अनेक प्रकारे उद्धभवु शकते जसे
1) चिंता.
2) चक्कर येणे.
3) बेशुद्ध होणे.
4) हलके वाटणे .
4. श्वासोच्छवासाची समस्या (Breathing Problem) :-
दम लागणे किंवा श्वास घेण्यास अधिक कष्ट घ्यावयास लागणे , विशेषत: थकवा किंवा छातीत दुखणे. काही स्त्रियांना श्वासोच्छवासाचा त्रास जाणवू शकतो, परंतु जेव्हा ते विश्राम अवस्थेत बसतात तेव्हा हि लक्षणे कमी होतात.
5. घाम येणे (Sweating) :-
काही कारणाशिवाय घाम येणे हे स्त्रियांमध्ये हृदयविकाराचे आणखी एक सामान्य लक्षण आहे. थंडी वाजून येणे आणि (Stickiness)जाणवणे हे देखील हृदयाच्या समस्यांचे लक्षण असू शकते.
6. शरीराच्या वरच्या भागात वेदना (Pain In upper body) :-
हे सामान्यतः इतर समस्यांमुळे देखील होऊ शकते आणि शरीराच्या वरच्या भागातील विशिष्ट स्नायू किंवा सांधे फक्त हेच कारणीभूत ठरू शकत नाही.
प्रभावित क्षेत्रांमध्ये हे समाविष्ट आहे:
1) मान दुखणे.
2) जबडा दुखणे .
3) खांदामध्ये वेदना होणे.
वेदना एका भागात सुरू होऊ शकते आणि हळूहळू इतरांमध्ये पसरू शकते किंवा ते अचानक जाणवू शकते.
7. झोपेची समस्या (Problem in sleeping) :-
झोपण्यात अडचण आणि असामान्यपणे जागे राहणे हे आधीपासून अस्तित्वात असलेला हृदयविकाराचा झटका येण्याची समस्या असू शकते. 2003 च्या अभ्यासात जवळपास निम्म्या स्त्रिया हृदयविकाराच्या झटक्यापूर्वीच्या आठवड्यात झोपेच्या समस्येशी झुंजत होत्या हे देखील नोंदवण्यात आले आहे.
या समस्या देखील समाविष्ट असू शकतात:
1) झोपण्यात अडचण.
2) रात्रभर जागे राहणे.
3) पुरेशी झोप असूनही थकवा जाणवणे.
8.पोटाच्या समस्या (Stomach Problems) :-
हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी काही स्त्रियांना पोटदुखी तसेच पोटात दाब आल्यासारखे जाणवू शकते. हृदयविकाराच्या झटक्याशी संबंधित इतर पाचन समस्यांचा समावेश असू शकतो –
1) आंबट ढेकर.
2) मळमळ.
3) उलटी होणे.
स्त्रियांनी, ही लक्षणे लक्षात घ्या आणि ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्या…