शेतीशिवार टीम, 8 जानेवारी 2022 : टाटा मोटर्सने (Tata Motors) 19 जानेवारी 2022 रोजी दोन नवीन CNG वाहने लॉन्च करणार आहेत. ही वाहने टाटा टियागो सीएनजी (Tata Tiago CNG) आणि टिगोर सीएनजी (Tigor CNG) आहेत. टाटा डीलर्सनी 5,000 ते 20,000 रुपयांच्या टोकन रकमेवर प्री-ऑर्डर स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. ही दोन्ही वाहने मारुती सुझुकी आणि ह्युंदाईच्या वाहनांशी स्पर्धा करणार आहे. जी सध्या सीएनजी पॅसेंजर व्हायकल सेगमेंट मध्ये अव्वल स्थानावर आहेत.
इंजिन आणि पॉवर :-
कंपनी सीएनजीसाठी (CNG) कोणतेही नवीन इंजिन आणणार नाही. टाटा टियागो आणि टिगोर दोन्ही 1.2-लिटर 3-सिलेंडर रेव्होट्रॉन पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहेत. हे इंजिन 85bhp आणि 113Nm टॉर्क जनरेट करते. सीएनजी प्रकारातही हेच इंजिन वापरण्यात येणार असल्याचे मानलं जात आहे.
सीएनजीमुळे पॉवर आणि टॉर्कमध्ये थोडासा बदल होऊ शकतो. CNG मॉडेलमधील 1.2-लिटर इंजिन 70-75bhp पॉवर आणि सुमारे 100Nm टॉर्क जनरेट करेल. जिथे पेट्रोल इंजिन मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्स ऑप्शनसह आणलं आहे. सीएनजीमध्ये (CNG) फक्त 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स दिला जाऊ शकतो.
डिझाइनमध्ये नाही होणार कोणताही बदल :-
Tata Tiago आणि Tigor CNG व्हेरियंटसाठी कोणतेही मोठे डिझाइन बदल होण्याची शक्यता नाही. परंतु पुढील आणि मागील बाजूस सीएनजी बॅजिंग नक्कीच दिले जाईल. सीएनजी किट सध्याच्या व्हेरियंटच्या एंट्री-लेव्हल आणि मिड-लेव्हल व्हेरियंटवर ऑफर केले जाण्याची अपेक्षा आहे. पेट्रोल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक या तिन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध असणारी टाटा टिगोर देशातील पहिली सेडान कर बनणार आहे.
Tiago CNG विभागातील सर्वात लोकप्रिय मॉडेल्स, Maruti Suzuki Wagon R आणि Grand i10 Nios यांच्याशी स्पर्धा करणार आहे. त्याच वेळी, टिगोर सीएनजीची (Tigor CNG) थेट स्पर्धा ह्युंदाई ऑरा सीएनजीशी (Hyundai Aura CNG) होईल.