शेतीशिवार टीम, 9 जानेवारी 2022 : जर तुम्ही नोकरी करत असाल आणि तुम्हाला पैशांची तुम्हाला खूप गरज असेल तर तुम्हाला एका तासाच्या आत 1 लाख रुपये मिळतील. खरं तर, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या ग्राहकांना मोठ्या सुविधा देत आहे. या अंतर्गत कोणत्याही सदस्यास गरज पडल्यास कोणतीही कागदपत्रे सादर न करता त्याच्या PF खात्यातून एक लाख रुपये काढू शकतो.
EPFO ही सुविधा पगारदारांना मेडिकल एडवांस क्लेम (Medical Advance Claim) अंतर्गत देत आहे. EPFO कार्यालयाला निवेदन देऊन ही माहिती दिली आहे. EPFO ने म्हटले आहे की, दीर्घ आजाराने ग्रासलेल्या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी तातडीने 1 लाख रुपयांची गरज भासल्यास PF खातेदार या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.
महत्वाच्या अटी जाणून घ्या :-
मेडिकल एडवांस क्लेम करणार्या कर्मचार्याच्या रूग्णाला सरकारी (Government) पब्लिक सेक्टर यूनिट (Public Sector Unit)/CGHS पॅनल केलेल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करणे आवश्यक आहे. जर Emergency स्थितीत खासगी रुग्णालयात दाखल केले असेल, तर यासंदर्भात चौकशी केली जाईल. त्यानंतरच तुम्ही मेडिकल क्लेमसाठी अँप्लीकेशन भरू शकता.
सुविधेअंतर्गत, तुम्ही फक्त 1 लाख रुपयांपर्यंतच अँडव्हान्स काढू शकता. तुम्ही कामाच्या दिवशी अर्ज करत असाल तर दुसऱ्याच दिवशी तुमचे पैसे खात्यात ट्रान्सफर केले जातील. हे पैसे कर्मचार्यांच्या खात्यात किंवा थेट हॉस्पिटलमध्ये ट्रांसफर केले जातात.
पैसे कसे काढायचे ?
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर 45 दिवसांच्या आत मेडिकल स्लिप जमा करावी लागते. तुमचे फायनल बिल अँडव्हान्स रक्कमेमध्ये अँडजस्ट करू द्या. आपण पैसे कसे काढू शकता ते समजून घेऊया…
तुम्ही www.epfindia.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाणून अँडव्हान्स क्लेम करू शकता.
>> अँडव्हान्स क्लेम तुम्ही unifiedportalmem.epfindia.gov.in वेबसाइटवरून देखील केला जाऊ शकतो.
>> येथे तुम्हाला Online Services वर क्लिक करावे लागेल.
>> आता तुम्हाला क्लेम (फॉर्म-31,19,10C आणि 10D) भरावा लागेल.
>> यानंतर तुम्हाला तुमच्या बँक खात्यातील शेवटचे 4 अंक टाकून व्हेरीफाईड करावं लागेल.
>> आता तुम्हाला (Proceed for Online Claim) वर क्लिक करावे लागेल.
>> ड्रॉप डाउनमधून पीएफ अॅडव्हान्स ( Form 31) निवडावा लागेल.
>> यानंतर तुम्हाला पैसे काढण्याचे कारणही द्यावे लागेल.
>> आता तुम्हाला रक्कम टाकावी लागेल आणि चेकची स्कॅन कॉपी अपलोड करावी लागेल.
>> यानंतर तुमचा अँड्रेस डिटेल्स भरा.
>> Get Aadhaar OTP वर क्लिक करा आणि आधार लिंक केलेल्या मोबाईलवर मिळालेला OTP टाका.
>> आता तुमचा क्लेम दाखल केला जाईल.