Take a fresh look at your lifestyle.

घेईन तर हीच Car..! डिलिव्हरी-किंमत माहित नसतानाही तब्बल 24,500 हून अधिक बुकिंग, पहा जबरदस्त फीचर्स अन् बुकिंग प्रोसेस..

0

ऑटो एक्सपो 2023 मध्ये मारुती सुझुकीने भारतातील Jimny 5 – डोर SUV आणि Fronx सादर केली, आणि आता कंपनीने दावा केलाय की, जिमनी आणि फ्रँक्सला आतापर्यंत 24,500 हून अधिक बुकिंग मिळाले आहेत. यामध्ये जिमनीसाठी 18,000 बुकिंग आणि फ्रँक्ससाठी 6,500 बुकिंग झालं आहेत. मात्र, या दोन गाड्यांच्या किंमतीबाबत कंपनीने अद्याप कोणताही खुलासा केलेला नसला तरी एकविध बुकिंग मिळाला आहे.

सध्या कंपनी दर महिन्याला 1000 जिमनी कार्स तयार करत आहे. अशा परिस्थितीत, त्याचा वेटिंग पिरियड 1 वर्षाच्या वर पोहोचू शकतो. कंपनीने दर महिन्याला प्रॉडक्शन वाढवलं ​तर वेटिंग पिरियड कमी होईल. जिम्नी Zeta आणि Alpha या दोन वेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दोन्हीमध्ये ते खरेदी करण्यास सक्षम असणार आहे.

जिमनीचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स :-

या ऑफ रोड जिमनी (Jimny) SUV कारमध्ये 1.5L, 4 सिलेंडर K-15-B पेट्रोल इंजिन मिळणार आहे. हे 6,000 RPM वर 101 BHP पॉवर आणि 4,000 RPM वर 130 NM टॉर्क निर्माण करण्यास सक्षम असणार आहे. कारला 5 – स्पीड मॅन्युअल आणि 4 – स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मिळेल. यामध्ये तुम्हाला फ्लॅट रिक्लाइन सीट्स पाहायला मिळतील. यामध्ये सेफ्टीसाठी 6 एअरबॅग्ज, हिल होल्ड असिस्टसह ईएसपी, हिल डिसेंट कंट्रोल, रिअर – व्ह्यू कॅमेरा यांसारखे फीचर्स पाहायला मिळतील. यात EBD सह ABS सारखे फीचर्स देखील देण्यात आहे आहेत.

मारुती Jimny च्या Zeta आणि Alpha व्हेरियंटचे फीचर्स :-

जिमनी Zeta वेरिएंटचे फीचर्स

15 – इंच स्टील व्हील्स
गनमॅटल ग्रे ग्रिल व्हिड क्रोम प्लेटिंग
हॅलोजन हेडलॅम्प
7 – इंच स्मार्टप्ले प्रो टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम
वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अँपल कारप्ले
4 स्पीकर्स
मल्टी – इन्फो डिस्प्ले
टिल्ट – अ‍ॅडजस्टेबल स्टीयरिंग व्हील
रियर वॉश आणि वाइपर
सेंट्रल लॉकिंग
मॅन्युअल एसी
इलेक्ट्रिक अँडजस्टेबल ORVM
स्टीयरिंग – माऊंट ऑडिओ कंट्रोल्स
पॉवर विंडो
6 एअरबॅग्ज
ABS सह EBD
रियर पार्किंग कॅमेरा
इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल
हिल होल्ड कंट्रोल
हिल डिसेंट कंट्रोल
लिमिटेड स्लिप ब्रेक डिफरेंशियल

जिमनी Alpha वेरिएंटचे फीचर्स

15 – इंच स्टील व्हील्स
ऑटो एलईडी हेडलॅम्प
हेडलॅम्प वॉशर
फॉग लॅम्प
लेदर वार्प्ड स्टीयरिंग व्हील
9 – इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम
वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अँपल कारप्ले
4 स्पीकर ARKAMYS – ट्यून्ड साउंड सिस्टम
अँटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल
इलेक्ट्रिक अँडजस्टेबल आणि फोल्ड करण्यायोग्य ORVM
क्रूझ कंट्रोल
पुश स्टार्ट / स्टॉप
डार्क ग्रीन-टिंटेड ग्लास
स्टीयरिंग – माऊंट ऑडिओ कंट्रोल्स
पॉवर विंडो
6 एअरबॅग्ज
ABS सह EBD
रियर पार्किंग कॅमेरा
इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल
हिल डिसेंट कंट्रोल
लिमिटेड स्लिप ब्रेक डिफरेंशियल

मारुती Jimny ची ऑनलाइन बुकिंग प्रोसेस..

1. मारुती जमनी बुक करण्यासाठी, Nexa च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. किंवा थेट www.nexaexperience.com/jimny पेजवर जा.

2. येथे तुम्हाला E – BOOK चा ऑप्शन दिसेल. इथे क्लिक करा जिमनीच्या बुकिंगसाठी एक नवीन पेज तुमच्या समोर उघडेल.

3. आता ई – बुकिंगच्या पेजवर तुम्हाला 3 स्टेप फॉलो कराव्या लागतील. STEP – 1 मध्ये तुम्हाला नाव, ईमेल, मोबाईल नंबर यासारखे पर्सनल डिटेल्स प्रविष्ट करावे लागतील. यानंतर तुमच्या फोनवर एक OTP येईल. तो पण टाका.

4. आता तुम्हाला कार बुकिंग मॉडेल निवडावे लागेल. यानंतर जिमनीचे वेरियंट आणि कलर निवडावा लागेल. यामध्ये तुम्हाला 7 कलर ऑप्शन्स मिळतील. यामध्ये 5 सिंगल आणि 2 ड्युअल कलर ऑप्शनचा समावेश आहे.

5. आता तुम्हाला तुमचे राज्य, शहर आणि डीलर निवडावा लागेल. कोणते पुढे जावे हे निवडल्यानंतर तळाशी डिस्क्लेमर दिलं जाईल. तुम्ही बुकिंग रद्द केल्यास तुम्हाला कॅन्सलेशन चार्ज म्हणून 500 रुपये द्यावे लागतील.

6. पुढील दोन स्टेप्समध्ये, तुम्हाला पेमेंटशी संबंधित डिटेल्स पूर्ण करावे लागतील. तुम्हाला पेमेंटसाठी सर्व प्रकारचे ऑप्शन मिळतील. तुम्हाला रु.25,000 ची रक्कम भरावी लागेल. बुकिंगची पुष्टी झाल्यानंतर, तुम्हाला तुमच्या फोन आणि ईमेलवर बुकिंग डिटेल्स मिळतील.

7. तुम्ही मारुती जिमनी ऑफलाइन देखील बुक करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या नेक्सा डीलरशिपला भेट द्यावी लागेल. 25,000 रुपये भरून तुम्ही ते येथे बुक करू शकता..

Leave A Reply

Your email address will not be published.