शेतीशिवार टीम, 26 डिसेंबर 2021 : कोरोना व्हॉयरसचा ओमायक्रॉन (Omicron) हा व्हॅरियंट सध्या जगभरात दहशत माजवत आहे. भारतातही ओमायक्रोन (Omicron) संक्रमित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून हा आकडा 400 वर पोहचला आहे.
त्यातही चिंतेची बाब म्हणजे या रुग्णांमध्ये 70 टक्क्यांहून काही रुग्ण असेही आढळले आहेत की, ज्यांनी कोरोनाची दोन्ही व्हॅक्सिन घेतली होती. तरीही त्यांना Omicron ची लागण झाली.
हे असं का होतंय ? असा प्रश्न तुम्हालाही पडला असणं… परंतु याचा शोध अमेरिकेतील ओहियो स्टेट युनिव्हर्सिटीतील पशु चिकित्सा विभागातील शास्त्रज्ञानी लावला आहे.
या विभागातील व्हायरॉलॉजीचे प्राफसर शान लू लिऊ (Shaan Lu Liu) यांच्या नेतृत्वाखाली शास्त्रज्ञांच्या एका टीम यासंदर्भात संशोधन केलं आहे . या संशोधकांना असे आढळून आलं आहे की , कोरोना व्हायरस मानवी शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीला जुमानत नाही. हा व्हायरस अँटिबॉडीजपासून वाचण्यासाठी एका पेशीतून दुसऱ्या पेशीमध्ये प्रवेश करत आहे.
व्हॅक्सिन घेतल्यानंतरही कोरोना व्हायरसची लागण होण्या मागचं हेच कारण आहे, असा दावा संशोधकांनी केला आहे .
‘प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल अँकॅडमी ऑसायन्सेस’ या विज्ञानविषयक नियतकालिकामध्ये या संबंधीचा विस्तृत शोधनिबंध प्रकाशित करण्यात आला आहे.
सेल टू सेल ट्रान्समिशनमुळे (Cell to cell transmission) फैलाव :-
संशोधकांचं असंही म्हणणं आहे की, कोरोना टू व्हायरसच्या सेल टू सेल ट्रान्समिशनमुळे व्हॅक्सिनमुळे तयार होणाऱ्या अँटिबॉडिज त्याला रोखू शकत नाहीत. प्रोफेसर लिऊ यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसच्या सेल टू सेल ट्रान्समिशनवर अधिक संशोधन करण्याची ही आवश्यकता आहे.