शेतीशिवार टीम, 17 जून 2022 : प्रत्येक नागरिकाला स्वतःचे घर मिळावे या उद्देशाने ‘प्रधानमंत्री’ आवास योजना सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत गरीब आणि गरजू लोकांना स्वस्त घरे दिली जातात. याअंतर्गत पात्र लोकांना अनुदानाचा लाभही दिला जातो. PM आवास योजनेत पहिल्यांदाच घर खरेदी करण्यासाठी सरकारकडून अनुदान दिलं जातं. घर खरेदी करण्यासाठी घेतलेल्या गृहकर्जावरील व्याजावर हे अनुदान मिळतं.

हे अनुदान कमाल 1.70 ते 2.67 लाख रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. जर तुम्ही देखील या योजनेअंतर्गत घर खरेदी करण्यासाठी अर्ज केला असेल आणि तुम्हाला घर कधी मिळेल हे जाणून घ्यायचे असेल. या योजनेची थेट तक्रार कुठे करायची ? आज शेती – शिवारच्या माध्यमातून आपण या योजनेशी संबंधित काही खास जाणून घेणार आहोत.

प्रधानमंत्री आवास योजना मध्ये अर्ज नाकारला गेला असेल तर येथे जाणून घ्या.

जर तुम्ही ग्रामपंचायत / नगरपरिषदेअंतर्गत PM आवास योजनेसाठी अर्ज केला असेल तर सर्वात आधी तुमचा फॉर्म बरोबर भरला आहे की नाही हे शोधून काढा, कारण अनेकांचे फॉर्म नाकारले जातात. आणि त्यांचा अर्ज का नाकारला जातो हे त्यांना माहीत पडतं नाही .हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने ऑनलाइन तक्रारी करण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे.

जेणेकरून ज्यांना घरकुलाचा अर्ज फॉर्म नाकारण्यात आला आहे, त्यांना घरी बसून या क्रमांकांच्या मदतीने माहिती मिळू शकणार आहे. एवढेच नाही तर या नंबरवर तुमची तक्रारही नोंदवू शकता….

तक्रार नोंदवण्यापूर्वी यादीत तुमचे नाव तपासा :-

PM आवास योजनेत तक्रार करण्यापूर्वी यादीतील नाव तपासा, कारण तुमचा फॉर्म नाकारला गेला आहे की नाही हे कळेल,तुमचा अर्ज योग्यरित्या भरला असेल आणि नाव यादीत असेल तर तुम्हाला त्याची प्रतीक्षा करावी लागणार नाही, कारण सरकारने 2022 च्या अखेरीस देशातील सर्व गरीब कुटुंबांना घरे देण्याचे आश्वासन दिले आहे. तरीही तुम्हाला घरी बसून तक्रार करायची असेल तर तुम्ही खाली दिलेल्या फोन नंबरवर कॉल करू शकता.हे टोल फ्री क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत :-

प्रधानमंत्री आवास योजना शहरी साठी टोल फ्री क्रमांक – 1800-11-3377 / 1800-11-6163
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण साठी टोल फ्री क्रमांक -1800-11-6446
प्रधानमंत्री आवास योजना टोल फ्री क्रमांक – 1800-11-8111
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी दुसरा टोल फ्री नंबर – 18003456527
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी मोबाईल व्हॉट्सऍप क्रमांक- 7004193202

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पात्रता / अटी:-

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज करणारी व्यक्ती भारताची कायमस्वरूपी रहिवासी असावी.
अर्जदाराचे वय 18 वर्षे किंवा त्याहून अधिक असावे.
अर्जदाराकडे कोणतेही घर किंवा प्रॉपर्टी नसावी.
अर्जदाराच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडे घर किंवा प्रॉपर्टी नसावी.
अर्जदाराने इतर कोणत्याहीसरकारी आवास योजनेचा लाभ घेतलेला नसावा .

प्रधानमंत्री आवास योजनेतील अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे :-

प्रधानमंत्री आवास योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता असेल, ही कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत-

1. अर्जदाराचे आधार कार्ड
2. अर्जदाराचा पत्रव्यवहार पत्ता
3. अर्जदाराचे उत्पन्न प्रमाणपत्र
4. बँक खात्याच्या तपशीलासाठी बँक पासबुकची प्रत
5. अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे फोटो कॉफी
6. आधारशी लिंक केलेल्या अर्जदाराचा मोबाईल क्रमांक.
7. उत्पन्नाचा दाखला
8. तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबाचे भारतात कोणतेही घर नाही असे प्रतिज्ञापत्र.

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज कसा कराल ?

प्रधानमंत्री आवासच्या https://pmaymis.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्या

होम पेजवर, वर ‘Citizen Assessment’ वर क्लिक करा आणि ड्रॉप-डाउन मेनूमधून ‘Apply online’ ऑप्शन निवडा. तुम्हाला 4 ऑप्शन दिसतील. तुम्हाला जे लागू होत असेल ते निवडा…

प्रधानमंत्री आवासच्या (PMAY) 2022 साठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ‘In situ slum redevelopment (ISSR)’ ऑप्शन निवडा. पुढील पेज वर तुम्ही आधार क्रमांक आणि नाव टाका. ही सर्व डिटेल्स भरा आणि तुमचा आधार तपशील पडताळण्यासाठी ‘तपासा (चेक)‘ वर क्लिक करा.

यानंतर Format – A दिसून येईल. या फॉर्मसाठी तुमचे सर्व डिटेल्स आवश्यक आहेत. प्रत्येक कोलम काळजीपूर्वक भरा.

प्रधानमंत्री आवासच्या (PMAY) : 2022 साठी सर्व डिटेल्स भरल्यानंतर, कॅप्चा प्रविष्ट करा आणि ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा, असा तुमचा अर्ज पूर्ण होईल.

टीप :- या योजनेअंतर्गत तुम्ही ऑनलाईन अर्ज जरी केला तरी तुम्हाला ग्रामपंचायतीला भेट देऊन योजनेसाठी PMAY अर्ज करता येणार आहे. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या ग्रामपंचायत / नगरपरिषदेकडे संपर्क साधू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या संबंधित प्रभाग किंवा तुम्ही गावातील सरपंच व ग्रामसेवकांना भेटून आवश्यक कागदपत्रे सबमिट करा.

2 Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *