देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कार्समध्ये मारुती सुझुकीचा पहिला नंबर लागतो. मारुती सुझुकीच्या गाड्यांनी भारतीय बाजारपेठेवर वर्चस्व गाजवलं आहे. मारुती सुझुकीची बलेनो ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी कार आहे. गेल्या वर्षी 2022 मध्ये देखील मारुतीने सर्वाधिक गाड्या विकल्या आहेत. पण, आज आपण अशा 7 सीटर कारबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यावर कदाचित कंपनीला सुद्धा खात्री नसेल की ती 2022 ची सर्वाधिक विक्री होणारी 7-सीटर सेगमेंट MPV होईल. त्यांनी 7 सीटर MPV मध्ये महिंद्राच्या बोलेरो आणि टाटालाही मागे टाकलं आहे.
MPV सेगमेंट मध्ये Ertiga चा बोलबाला..
खरं तर, आपण मारुती सुझुकीच्या सर्वाधिक मागणी असलेल्या MPV Ertiga बद्दल जाणून घेणार आहोत. टॉप टेन कारच्या यादीत एकट्या मारुतीच्या 7 कार असल्या तरी या MPV ने मारुती सुझुकीला नंबर – 1 बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कारण, डिसेंबर 2022 च्या शेवटच्या महिन्यात या उत्कृष्ट MPV च्या 12,273 कार विकल्या गेल्या आहेत.
नोव्हेंबर 2022 च्या तुलनेत ही विक्री थोडी कमी असली तरी. दुसरीकडे, जर आपण डिसेंबर 2021 बद्दल बोललो तर, मारुती सुझुकीने डिसेंबर 2022 मध्ये या MPV ची अधिक विक्री केली आहे, कारण डिसेंबर 2021 मध्ये, कंपनी मारुती Ertiga च्या केवळ 11,840 युनिट्स विकू शकली होती.
विक्रीमागचं नेमकं कारण काय ?
मारुती Ertiga मागील सर्वात मोठा विक्री बिंदू म्हणजे त्याचे उत्कृष्ट मायलेज. होय, 7 सीटर असूनही Ertiga चे CNG व्हेरियंट 26km/Kg पेक्षा जास्त मायलेज देण्यास सक्षम आहे आणि त्याची किंमत देखील खूप कमी आहे. किमतीबद्दल बोलायचं झालं तर किंमत रु. 8.35 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते आणि रु. 12.79 लाख (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.
पॉवरट्रेन आणि फीचर्स :-
या स्वस्त MPV कारला 1.5-लीटर पेट्रोल इंजिन मिळते, जे 103PS आणि 137Nm जनरेट करण्यास सक्षम आहे. यामध्ये तुम्हाला CNG चा ऑप्शनही देण्यात आला आहे. त्याच्या फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर यात 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अँड्रॉइड ऑटो आणि अँपल कारप्लेसह पॅडल शिफ्टर्स, ऑटो हेडलाइट्स, ऑटो एअर कंडिशन, क्रूझ कंट्रोल सारखे फीचर्स देण्यात आले आहे.