Take a fresh look at your lifestyle.

भारतातली पहिली सगळ्यात स्वस्त EV मोटरसायकल लाँच, 130Km ची रेंज, 3 तासांत फुल चार्ज, टॉप स्पीड 90Kmph, किंमत असेल फक्त..

0

पर्यावरणाला पूरक आणि पेट्रोलच्या वाढत्या किंमतींपासून मुक्ती, या आणि यासारख्या अनेक कारणांमुळे गेल्या दोन वर्षांत भारतात इलेक्ट्रिक वाहनांची लोकप्रियता आणि मागणी झपाट्याने वाढली आहे. यामुळे भारतातील आणि परदेशातील अनेक मोठमोठ्या ऑटोमोबाईल कंपन्यांसोबतच अनेक छोटे स्टार्टअप्सही त्यांची नवीन इलेक्ट्रिक वाहने भारतात लॉन्च करत आहेत. इलेक्ट्रिक वाहनांची उपोयोगीता लक्षात घेऊन भारत सरकारही देशात इलेक्ट्रिक मोबिलिटी वाढवण्यावर भर देत आहे. 

दरम्यान झपाट्याने वाढणाऱ्या व मोठी स्पर्धा असणाऱ्या या बाजारात, सोमवार, दिनांक 31 जानेवारीला रोजी देशात नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकल लाँच करण्यात आली आहे.

भारतातील इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक Pure EV ने आज आपली नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकल ecoDryft लाँच केली आहे. विशेष म्हणजे ही इलेक्ट्रिक मोटारसायकल भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक मोटारसायकल ठरली आहे.

भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक मोटरसायकल..

Pure EV ecoDryft ची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक मोटरसायकल ठरली आहे. कंपनीची ही इलेक्ट्रिक मोटरसायकल केवळ 99,999 रुपयांपासून ग्राहकांना मिळणार आहे. या बाईकचे बेस मॉडेल 99,999 रुपयांच्या किमतीत देशात लॉन्च करण्यात आले आहे. मात्र, ही किंमत फक्त दिल्लीत उपलब्ध असणार आहे.

देशातील इतर राज्यांमध्ये मात्र या मोटरसायकलची किंमत 1,14,999 रुपये इतकी असेल. प्रत्येक राज्यात इलेक्ट्रिक वाहनांवर उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या सबसिडीनुसार त्याची ऑन-रोड किंमत देखील बदलू शकते. तरीसुद्धा ही इलेक्ट्रिक मोटरसायकल अनेक पेट्रोलवर चालणाऱ्या मोटारसायकलपेक्षा स्वस्त दारात मिळत आहे.

कशी आहे Pure EV ecoDryft

Pure EV ecoDryft इलेक्ट्रिक मोटरसायकलमध्ये 3.0 kWh पॉवरचा बॅटरी पॅक वापरण्यात आला आहे. तसेच 3kW पॉवरची इलेक्ट्रिक मोटर वापरली आहे. कंपनीचा दावा आहे की या इलेक्ट्रिक मोटरसायकलला सिंगल चार्जिंगमध्ये 130 किलोमीटरपर्यंतची राइडिंग रेंज मिळेल.

माहिती देताना कंपनीने सांगितले की, या इलेक्ट्रिक मोटरसायकलची बॅटरी अवघ्या 3 तासात 20% ते 80% पर्यंत चार्ज होते. तर या बाईकची टॉप स्पीड 90 किलोमीटर प्रति तास इतकं आहे.

Pure EV ecoDryft खरेदी किंवा डिलरशिपसाठी :- इथे क्लिक करा 

काय आहेत फीचर्स.. 

प्युअर ईव्ही इकोड्रायफ्ट इलेक्ट्रिक मोटरसायकलमध्ये तुम्हाला सर्वोत्तम फीचर्स मिळत आहेत. याबाबत माहिती देताना कंपनीने सांगितले की, या इलेक्ट्रिक मोटरसायकलमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम, 140 किलो वजनाची लोडिंग क्षमता, 3 राइडिंग मोड (ड्राइव्ह मोड, क्रॉस ओव्हर मोड आणि थ्रिल मोड), सेंट्रल लॉकिंग, डिजिटल स्पीडोमीटर, ट्रिपमीटर, ओडोमीटर आणि टॅकोमीटर आहे. सोबतच एलईडी हेडलाईट, टेललाइट आणि इतर अनेक जबरदस्त फीचर्स या बाईकमध्ये देण्यात आले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.