शेतीशिवार टीम, 26 मे 2022 :- कोमाकी (Komaki ) या इलेक्ट्रिक कंपनीने भारतीय बाजारात दोन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्याची घोषणा केली. Komaki LY 3 कलर ऑप्शनमध्ये ऑफर केली आहे. ही गार्नेट रेड, जेट ब्लॅक आणि मेटल ग्रे रंगांमध्ये उपलब्ध आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत 88,000 रुपये ठेवण्यात आली आहे. तर हायर-स्पेक मॉडेल Komaki DT 3000 ला parvful 3000W BLDC मोटर मिळते. कंपनीने त्याची एक्स-शोरूम किंमत 1,22,500 रुपये निश्चित केली आहे.

Komaki DT 3000 पॉवर, रेंज आणि स्पीड :-

Komaki DT 3000 ला त्याचे नाव त्याच्या 3000 वॅट BLDC मोटरवरून मिळालं आहे. या मोटरला पॉवर देण्यासाठी 62V52AH लिथियम बॅटरी पॅक देण्यात आला आहे. तो ‘बाजाराच्या अपेक्षेपेक्षा खूप पुढे’ असल्याचा कंपनीचा दावा केला आहे. कंपनीचा दावा आहे की, ही मोटर स्कूटरला 80 kmph च्या टॉप स्पीडवर घेऊन जाते. तसेच, कंपनीचा दावा आहे की, या बॅटरीमुळे ही स्कूटर एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 180 ते 220KM अंतर कापू शकते. हे मेटल ग्रे, ट्रान्सलुसेंट ब्लू, जेट ब्लॅक आणि ब्राइट रेड अशा चार वेगवेगळ्या कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.

Komaki LY :-

कंपनीचं म्हणणं आहे की, Komaki LY ही भारतातील पहिली इलेक्ट्रिक स्कूटर आहे जी अँटी-स्किड फंक्शन मिळवते. मात्र, कंपनीने नवीन फंक्शनबाबत फारशी माहिती दिलेली नाही. पण ते ‘सुरक्षित आणि संतुलित ड्राइव्ह सुनिश्चित करते’ असे नमूद करते. Komaki LY एका पूर्ण चार्जवर 90 किमी अंतर कापते.

फीचर्स :-

दोन्ही नवीन स्कूटर काही आकर्षक फीचर्ससह येतात. यामध्ये सेल्फ डायग्नोसिस इन्स्ट्रुमेंट, डिस्क ब्रेक, मोबाईल चार्जिंग पॉइंट, नॉईज फ्री फंक्शनिंग, रिव्हर्स असिस्ट, रिमोट लॉक, टेलिस्कोपिक शॉकर, क्रूझ कंट्रोल आणि ब्लूटूथ स्पीकर यासारख्या फीचर्सचा समावेश आहे.

Komaki इलेक्ट्रिक डिव्हिजनचे संचालक गुंजन मल्होत्रा ​​म्हणाले,भारतीय ग्राहकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर,आमच्या ग्रीन आणि सस्टेनेबल मोबिलिटी सोल्यूशन्सवर विश्वास दाखवल्यानंतर,आम्ही भारतीय रस्त्यावर पुन्हा चमकण्यासाठी दोन नवीन ईव्हीसह परत येण्यास इम्प्रेस झालो आहोत. DT 3000 त्याच्या अद्वितीय बॅटरी आणि LY अँटी-स्किड फंक्शनसह राइडर्स सेगमेंट मध्ये दोन सर्वोत्कृष्ट वाहने चालवण्याचा अभिमान बाळगतील –

नुकतीच दोन वाहने लाँच केली :-

या वर्षी जानेवारीमध्ये Komaki ‘ने क्रूझर मोटरसायकल रेंजर (Ranger) आणि क्लासिक स्कूटर व्हेनिस (Venice) सादर केली आहे. मल्होत्रा ​​म्हणाले, आमच्या नवीन काळातील इलेक्ट्रिक वाहने त्यांच्या हाय क्वालिटी, हाय परफॉर्मेंस,पावर, स्पोर्टी लूक, लो मेंटेनेंस आणि लॉन्ग सर्विस लाइफ बाजारात मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहेत. याशिवाय,दर्जन अत्याधुनिक फीचर्स आणि परवडणाऱ्या किंमतीसह, Komaki ची वाहने ग्राहकांसाठी ‘व्हॅल्यू फॉर मनी’ ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *