Take a fresh look at your lifestyle.

अरे देवा ! दर 30 तासांनी एक अब्जाधीश, तर दर 33 तासांनी होतायेत 10 लाख गरीब । ऑक्सफॅम इंटरनॅशनलचा रिपोर्ट…

0

शेतीशिवार टीम, 24 मे 2022 :- नोटबंदी, GST नंतर जेव्हा कोरोनाने जगात विध्वंस आला, कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या हिसकावून घेतल्या, करोडो कुटुंबांची बचत संपली,लोकांना स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबावर उपचार करण्यासाठी कर्ज घ्यावं लागलं, तेव्हा जगात असे काही लोकं होते त्यांना या लॉक डाऊनचा फायदा होत होता. 

कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीत अब्जाधीशांनी 23 वर्षात जेवढं पैसं कमावलं नव्हतं तेवढं त्यांनी या काळात कमावलं. ऑक्सफॅम इंटरनॅशनल (Oxfam International) च्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे.

ऑक्सफॅम इंटरनॅशनलने आपल्या अहवालात म्हटलं आहे की, जगातील अब्जाधीशांच्या संपत्तीत 23 वर्षात इतकी वाढ झाली नाही जितकी कोरोनाच्या पहिल्या 24 महिन्यांत वाढली आहे.

जगात सध्या 2 हजार 668 अब्जाधीश आहेत. या अब्जाधीशांकडे एकत्रितपणे $12.7 ट्रिलियन म्हणजेच 984.95 लाख कोटी रुपयांची मालमत्ता आहे. त्यांच्याकडे असलेली संपत्ती जगाच्या GDP च्या 14% आहे.

अहवालातील 5 महत्त्वाच्या गोष्टी…

1. श्रीमंत झाला अधिक श्रीमंत :-

महामारीनंतर जगात 573 अब्जाधीशांची संख्या वाढली. म्हणजेच दर 30 तासांनी एक अब्जाधीश वाढला. महामारीच्या काळात या अब्जाधीशांच्या संपत्तीत 42 टक्क्यांनी म्हणजेच 293.16 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. जगातील 3.1 अब्ज लोकांकडे इतकी संपत्ती नाहीये जितकी संपत्ती 10 श्रीमंत लोकांकडे आहे.

2. गरीब झाला अधिक गरीब :

कोरोना महामारीमुळे जगातील 99% लोकांच्या उत्पन्नात घट झाली आहे. एकट्या 2021 मध्ये 12.5 कोटींहून अधिक लोकांनी नोकऱ्या गमावल्या. 2021 मध्ये, सर्वात गरीब 40% लोकांच्या उत्पन्नात घट झाली. महामारीपूर्वी सरासरी 6.7% लोकांच्या कमाईत घसरण होत होती.

3. कंपन्या झाल्या मालामाल :

औषधी व्यवसायाशी संबंधित 40 लोक महामारीमध्ये अब्जाधीश झाले. Moderna आणि Pfizer सारख्या कंपन्यांनी प्रत्येक सेकंदाला 1 हजार डॉलर (77,555 रुपये) नफा कमावला. अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, फार्मा कंपन्यांनी जेनेरिक उत्पादनासाठी सरकारकडून 24 पट जास्त शुल्क आकारलं आहे.

4. महिला झाल्या बेरोजगार :

साथीच्या आजारापूर्वी, Gender Pay तील तफावत 100 वर्षांत संपेल असा अंदाज होता, परंतु आता यास 136 वर्षे लागू शकतात. 2020 मध्ये, स्त्रिया पुरुषांपेक्षा 1.4 पट अधिक श्रमशक्तीच्या बाहेर असण्याची शक्यता होती. 2019 च्या तुलनेत 2021 मध्ये नोकरी करणाऱ्या महिलांची संख्या 1.3 कोटी पेक्षा कमी होती. तर, कार्यरत पुरुषांची संख्या 2019 च्या पातळीवर पोहोचली आहे.

5. गरिबांच्या जगण्यातही होणार घट :-

श्रीमंत देशांमध्ये राहणाऱ्या लोकांचे सरासरी उत्पन्न गरीब देशांमध्ये राहणाऱ्या लोकांपेक्षा 16 वर्षे जास्त आहे. आरोग्य सुविधांअभावी दरवर्षी 56 लाख लोकांचा मृत्यू होत आहे. त्यानुसार दररोज 15 हजार मृत्यू होतात. सो पोलो, ब्राझीलच्या श्रीमंत भागात राहणारे लोक गरीब भागात राहणाऱ्या लोकांपेक्षा 14 वर्षे जास्त जगतील.

गरिबीत होणार आणखी वाढ…

ऑक्सफॅमच्या अहवालानुसार गेल्या वर्षी खाद्यपदार्थांच्या किमती 33.6 टक्क्यांनी वाढल्या होत्या. यंदाही भावात 23% वाढ होण्याची शक्यता आहे. अन्नधान्याच्या किमती वाढल्याने जगात आणखी गरिबी वाढेल. यावर्षी 26.3 कोटी लोक खूप गरीब असतील. त्यानुसार या वर्षी दर 33 तासांनी १ कोटी लोक गरीब होतील.

गरिबी दूर कशी होईल दूर ?

श्रीमंत आणि गरीब यांच्यातील ही दरी कमी करण्यासाठी ऑक्सफॅमने अधिक कर वाढवण्याची सूचना केली आहे. $5 दशलक्ष मालमत्ता असलेल्या लोकांवर 2% आणि $50 दशलक्ष मालमत्ता असलेल्या लोकांवर 3% कर आकारला जावा. त्याच वेळी, ज्यांच्याकडे $1 बिलियनपेक्षा जास्त मालमत्ता आहे

त्यांच्यावर 5% कर आकारला जावा. कर वाढवून, जगातील श्रीमंतांकडून दरवर्षी 2.52 ट्रिलियन डॉलर (रु. 195.44 लाख कोटी) कर येईल, ज्यामुळे जगातील 2.3 अब्ज लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यास मदत होईल…

Leave A Reply

Your email address will not be published.