शेतीशिवार टीम,16 डिसेंबर 2021 :- Voter ID-Aadhaar Linking : भारतीय निवडणुकांमध्ये बनावट मतदानाच्या तक्रारी खूप सामान्य आहेत. निवडणूक आयोग आणि भारत सरकारचे प्रयत्नही या समस्येवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरत आहे. आता केंद्र सरकारने यावर आळा बसवण्यासाठी एक मोठं पाऊल उचललं आहे.
बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मतदार ओळखपत्र (Voter ID) आधार कार्डशी (Aadhaar) लिंक करण्यास परवानगी दिली आहे.
मतदार ओळखपत्र (Voter ID) आणि आधार कार्ड (Voter ID) कसं कराल लिंक :-
स्टेप बाय स्टेप जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस :-
1- सर्वप्रथम https://voteportal.eci.gov.in वर जा.
2 – यानंतर Mobile no / email / Voter ID No आणि पासवर्डसह Login करा.
3 – यानंतर राज्य, जिल्ह्यासह तुमची वैयक्तिक माहिती शेअर करा.
4 – सर्व माहिती दिल्यानंतर सर्च (Search) बटणावर क्लिक करा. सरकारी आकडेवारीशी माहिती जुळली तर ती स्क्रीनवर दिसायला सुरुवात होईल.
5 – यानंतर ‘Feed Aadhaar No’ वर क्लिक करा.
6 – तुमच्या स्क्रीनवर एक पेज उघडेल. येथे तुम्हाला आधार कार्डवर लिहिलेल्या नावासह इतर माहिती द्यावी लागेल.
7- सर्व माहिती दिल्यानंतर, क्रॉस चेक करा आणि नंतर सबमिट बटण दाबा.
8 – यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन यशस्वी झाल्याचं तुमच्या स्क्रीनवर दिसायला सुरुवात होईल.
*** तुम्ही SMS द्वारे देखील लिंक करू शकता :-
आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र लिंक (Aadhaar-Voter ID Link) करण्यासाठी आणि 166 किंवा 51969 वर <आधार क्रमांक> एसएमएस करा.
*** तुम्ही कॉल करून देखील लिंक करू शकता :-
एक फोन कॉलद्वारे मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड देखील लिंक करू शकतात. यासाठी तुम्हाला सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत 1950 वर कॉल करावा लागेल.