Take a fresh look at your lifestyle.

1 एप्रिललाचं महागाईचा इतका मोठा धक्का । LPG सिलेंडर आजपासून तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी महागला…

0

शेतीशिवार टीम : 1 एप्रिल 2022 : आज LPG सिलिंडरचे नवीन दर आज जाहीर करण्यात आले आहेत. यावेळी एलपीजी (LPG) गॅस सिलेंडर एका झटक्यात 250 रुपयांनी महागला आहे. ही वाढ घरगुती एलपीजी सिलिंडरमध्ये नाही तर व्यावसायिक (Commercial) गॅस सिलेंडरमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे घरगुती एलपीजी (LPG) सिलेंडर ग्राहकांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. कारण, अवघ्या 10 दिवसांपूर्वी घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर वाढवण्यात आले होते, तर 22 मार्च रोजी व्यावसायिक(Commercial) सिलिंडर स्वस्त झाले होते.

प्रदीर्घ काळानंतर 22 मार्चपासून पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी (LPG) वर ग्राहकांना दिवसेंदिवस महागाईचे मोठे धक्के बसू लागले आहे. या दिवशी विना सब्सिडी घरगुती एलपीजी सिलेंडर 50 रुपयांनी वाढला आहे.

कारण 6 ऑक्टोबर 2021 नंतर घरगुती LPG सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आज म्हणजेच नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशीही, घरगुती LPG सिलिंडर दिल्लीत 949.50 रुपये, कोलकात्यात 976 रुपये, मुंबईत 949.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 965.50 रुपये आहे.

आजपासून 19 किलोचा एलपीजी (LPG) सिलिंडर 250 रुपयांनी महागला आहे

1 मार्च 2012 रोजी दिल्लीत19 किलोचा एलपीजी सिलेंडर 22 मार्च रोजी 2003 रुपयांपर्यंत खाली आला. मात्र आजपासून तो पुन्हा भरण्यासाठी 2253 रुपये खर्च करावे लागणार आहे. त्याचबरोबर कोलकात्यात 2087 ऐवजी आता 2351 रुपये आणि मुंबईत 1955 ऐवजी 2205 रुपये आजपासून खर्च करावे लागणार आहेत. चेन्नईमध्ये सगळ्यात महाग म्हणजे आता त्याची किंमत 2138 रुपयांऐवजी 2406 रुपये असणार आहे.

1 मार्च रोजी 19 किलोच्या व्यावसायिक (Commercial) सिलेंडरचा दर 105 रुपयांनी वाढला होता आणि 22 मार्चला 9 रुपयांनी स्वस्त झाला होता. त्याच वेळी, ऑक्टोबर 2021 ते 1 फेब्रुवारी 2022 दरम्यान, व्यावसायिक सिलेंडरची किंमत 170 रुपयांनी वाढली आहे. 1 ऑक्टोबर रोजी दिल्लीत व्यावसायिक (Commercial) सिलेंडरची किंमत 1736 रुपये होती.

नोव्हेंबर 2021 मध्ये ते 2000 झाली आणि डिसेंबर 2021 मध्ये 2101 रुपये झाले. यानंतर, जानेवारीमध्ये ते पुन्हा स्वस्त झाले आणि फेब्रुवारी 2022 ला ते स्वस्त झाले आणि 1907 रुपयांवर आले. यानंतर 1 एप्रिल 2022 रोजी तो 2253 रुपयांवर पोहोचला.

Leave A Reply

Your email address will not be published.