मारुतीची नवी हॅचबॅक Car लॉन्च, 35KM पर्यंत मायलेज ; पहा फीचर्स…

0

शेतीशिवार टीम, 1 एप्रिल 2022 :- देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने फ्लीट ऑपरेटर्ससाठी नवीन वॅगन आर (Wagon R) लॉन्च केली आहे. त्याला WagonR Tour H3 असं नाव देण्यात आलं आहे.

नवीन मॉडेल पेट्रोल आणि सीएनजी (CNG) या दोन व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. Tour H3 पेट्रोल व्हेरियंटची किंमत 5.39 लाख रुपये आहे, तर CNG व्हेरियंटची किंमत 6.34 लाख रुपये (Ex-showroom) आहे.

Maruti Suzuki WagonR Tour H3 मध्ये 1.0-लिटर, 3-सिलेंडर, K10C पेट्रोल इंजिन आहे. हे 5,500rpm वर 64bhp पॉवर आणि 3,500rpm वर 89Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. त्याचप्रमाणे, सीएनजी (CNG) व्हर्जन 56bhp पॉवर आणि 82Nm पीक टॉर्क जनरेट करतं. इंजिनला 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स स्टॅन्ड रूपमध्ये जोडलेलं आहे.

34KM पर्यंत मायलेज…

मायलेजच्या बाबतीत, पेट्रोलवर चालणारी WagonR Tour H3 कार 25.40kmpl मायलेज देते. CNG मॉडेलमध्ये ARAI प्रमाणित इंधन कार्यक्षमता 34.73km/kg असल्याचा दावा केला जातो. हे सुपीरियर व्हाईट आणि सिल्की सिल्व्हर या दोन रंगांच्या ऑप्शनमध्ये ऑफर केलं आहे.

फीचर्स :- 

हॅचबॅकला बॉडी कलर्ड बंपर, व्हील सेंटर कॅप आणि ब्लॅक-आउट ORVM, आउटसाइड डोअर हँडल आणि ग्रिल मिळतात. यात फ्रंट केबिन लॅम्प्ससह ड्युअल टोन इंटीरियर, ड्रायव्हर साइड सन व्हिझरसह टिकट होल्डर आणि पुढील आणि मागील हेडरेस्ट मिळतात.

यात साइड ऑटो डाउन फंक्शन, मॅन्युअल एसी, मागील पार्सल ट्रे, रिक्लिनिंग आणि फ्रंट स्लाइडिंग सीट्स, ड्युअल एअरबॅग्ज, EBD सह ABS, स्पीड लिमिटिंग फंक्शन, मागील पार्किंग सेन्सर्स आणि सेंट्रल डोअर लॉकिंगसह फ्रंट पॉवर विंडो देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.