अर्थसंकल्प 2022: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी 1 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पानंतर सर्वसामान्यांच्या मनात पहिला विचार येतो की, आता काय स्वस्त होणार आणि काय महाग होणार ? तर ही आहे त्या वस्तूंची यादी ज्या FY23 मध्ये स्वस्त आणि महाग होतील

मोबाईल फोन होणार स्वस्त :-

2022-23 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी प्रस्तावित केल्यानुसार मोबाईल फोन आणि मोबाईल फोन चार्जरसह मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणार्‍या वस्तू स्वस्त होणार आहेत.

हिऱ्याचे दागिने होणार स्वस्त :-

अर्थमंत्र्यांनी कृषी क्षेत्रासाठी भारतात उत्पादित साधने आणि उपकरणांवर सूट वाढवण्याची घोषणा केली. म्हणजेच आता शेतीमाल स्वस्त होणार आहे. याशिवाय कट आणि पॉलिश्ड हिऱ्यांवरील कस्टम ड्युटी बजेटमध्ये 5 % टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. म्हणजेच दागिने स्वस्त होणार आहे. याशिवाय चामड्याच्या वस्तू आणि स्टील स्वस्त होणार आहे. बटणे, झिपर्स, लेदर, पॅकेजिंग बॉक्स स्वस्त होतील. श्रिंप एक्वा कल्चर वरील शुल्क कमी करण्यात आले आहे.

छत्र्यांची खरेदीवर कस्टम ड्युटी वाढवली :-

त्याचबरोबर छत्र्यांची खरेदी महाग होणार आहे. छत्र्यांवर कस्टम ड्युटी वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच भारतात बनवता येणारी आणि आयात करता येणारी औषधे महाग होणार आहेत.

लिस्टमध्ये पहा, काय स्वस्त आणि काय महाग :-

स्वस्त :-

कापड
चप्पल
रत्न आणि हिऱ्याचे दागिने
इमिटेशन ज्वेलरी
मोबाईल फोन
मोबाईल फोन चार्जर
कृषी उपकरणे आणि साधने
ऑयल
परदेशातून येणाऱ्या मशिन्स स्वस्त

महाग :-

सर्व आयात वस्तू महागणार.
विना ब्लेंडिंग वाले फ्यूल
छत्रीवरील ड्युटी वाढली, म्हणजेच छत्री महागात घ्यावी लागेल.

कोणते मोठे निर्णय घेतले : –

आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही

छाप्यात सापडलेले पैसे पूर्णपणे जप्त केले जातील.

क्रिप्टो करन्सीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर 30% कर भरावा लागेल आणि क्रिप्टो करन्सीवरही 1% टीडीएस (TDS) लागू होईल.

केंद्राप्रमाणेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही लाभ देण्याचा प्रयत्न

देशात कुठेही वाहनांच्या रजिस्ट्रेशनसाठी एकच पोर्टल असणार

कर्मचार्‍यांच्या पेन्शनमध्ये कर सवलत

दिव्यांगांच्या पालकांना करात सूट

आयकर रिटर्नमधील त्रुटी दोन वर्षांत दुरुस्त

नव्या आर्थिक वर्षात डिजिटल करन्सी होणार लॉन्च

बँक-पोस्ट ऑफिसचे पैसे ट्रान्सफर करणं सर्वकाही डिजिटल होईल

डिजिटल युनिव्हर्सिटी उघणार ; पीएम ई विद्या 200 चॅनेल्सपर्यंत विस्तारली जाणार

एलआयसीच्या (IPO) आयपीओवर वेग, खासगीकरणही यंदा वाढणार…

एमएसएमई (MSME) क्षेत्राला 2 लाख कोटी अतिरिक्त कर्ज….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *