शेतीशिवार टीम : 30 ऑगस्ट 2022 :- महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड (MEML) ने आज आपली नवीन इलेक्ट्रिक कार्गो थ्री-व्हीलर झोर ग्रँड (Zor Grand) भारतीय मार्केटमध्ये लॉन्च केली आहे, ज्याची किंमत रु.3.60 लाख (Ex-showroom, बंगलोर) आहे.
Zor Grand या कार्गो सेगमेंटमध्ये नवीन इलेक्ट्रिक 3-व्हीलर लॉन्च करून कंपनीला खूप आशा आहेत. विशेष म्हणजे, झोर ग्रँड इलेक्ट्रिक 3-व्हीलर लाँच करण्यापूर्वी, 12,000 युनिट्स आधीच झाले आहेत. कंपनीला महिंद्र लॉजिस्टिक्स, मॅजेन्टा ईव्ही सोल्युशन्स, मूव्हिंग ईव्ही नाऊ यांसारख्या टॉप लॉजिस्टिक कंपन्यांसोबत धोरणात्मक सामंजस्य कराराद्वारे हे बुकिंग मिळालं आहे.
महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे (MEML) सीईओ सुमन मिश्रा, यांनी मीडियाला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, “लास्ट माईल डिलिव्हरी आणि लॉजिस्टिक सेगमेंटला विश्वासार्ह आणि इकोनॉमिकल कार्गो आणि हाय क्वालिटीच्या इलेक्ट्रिक वाहनांची गरज भासू लागली आहे. या मागण्या प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. या गरजा पूर्ण करण्यासाठी, आम्ही न्यू झोर ग्रँड (Zor Grand) लॉन्च केली आहे. ही पॉवर – पॅक्ड परफॉर्मन्स देते आणि आम्हाला ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यास सक्षम ठरते.
पॉवर, परफॉर्मेंस, ड्राइविंग रेंज :-
नव्याने लॉन्च झालेल्या महिंद्रा झोर ग्रँड इलेक्ट्रिक 3-व्हीलरमध्ये कंपनीने 10.24kWh क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक दिला आहे. याशिवाय, यात 12kW क्षमतेची इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे, जी 50Nm टॉर्क जनरेट करते, जी इंडस्ट्रीमध्ये सर्वोत्तम असल्याचा कंपनीचा दावा आहे. कंपनीचं म्हणणं आहे की, ही इलेक्ट्रिक 3- व्हीलर 11.5 डिग्रीची ‘बेस्ट-इन-इंडस्ट्री’ ग्रेडेबिलिटी देते.
महिंद्राचा दावा आहे की, झोर ग्रँड एका चार्जवर 150 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देण्यास सक्षम आहे. त्याची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी फक्त 4 तास लागतात आणि तिचा टॉप स्पीड 50 किलोमीटर प्रति तास आहे. महिंद्रा झोर ग्रँड इलेक्ट्रिक 3-व्हीलरमध्ये पारंपारिक 3-चाकी गाड्यांप्रमाणे गिअरबॉक्स नाही, त्याऐवजी, ती फॉरवर्ड, न्यूट्रल आणि रिव्हर्स या तीन मोडसह येते. झोर ग्रँड फ्री हॅन्ड आणि आरामदायी ड्रायव्हिंगचा अनुभव देते असा कंपनीचा दावा आहे.
महिंद्रा झोर ग्रँड इलेक्ट्रिक 3 व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे – 140 क्यूबिक फिट बॉक्स (Cu.ft) असलेली डिलिव्हरी व्हॅन बॉडी, दुसऱ्या व्हेरियंटमध्ये 170 क्यूबिक फिट बॉक्स आणि तिसऱ्या व्हेरियंटमध्ये पिकअप-स्टाईल बॉडी.
ही आहेत जबरदस्त फीचर्स :-
या इलेक्ट्रिक थ्री-व्हीलरमध्ये कंपनीचे टेलिमॅटिक्स युनिट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, GPS, ऑफबोर्ड चार्जर, केबिन लाईट, मोबाईल होल्डर, लॉक करण्यायोग्य ग्लोव्ह बॉक्स, रिव्हर्स बजर, स्पेअर व्हील प्रोव्हिजन, हॅझर्ड इंडिकेटर आणि इतर काही फीचर्स आहेत. कंपनी या इलेक्ट्रिक थ्री-व्हीलरवर 3 वर्षे / 80,000 Km ची वॉरंटी देते. शिवाय, लिथियम-आयन बॅटरी पॅक 5 वर्षांच्या वॉरंटीसह येतो.
महिंद्राचा दावा आहे की, झोर ग्रँड डिझेल युजर्सला ग्रँड डिझेल थ्री – व्हीलर आणि CNG थ्री – व्हीलरच्या तुलनेत केवळ 5 वर्षांत अनुक्रमे 6 लाख रु. आणि रु. 3 लाखांपर्यंत मालकी खर्चाची बचत करू शकते.