मारुती सुझुकी आता आपली न्यू Jimny ज्यांना ऑफ – रोडिंगची इच्छा आहे त्यांच्यासाठी लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. 4 डोअर्स आणि स्मॉल इंजिनसह, जिमनी महिंद्रा थारला आव्हान देण्यासाठी सज्ज आहे. पण मारुती सुझुकीला थारचे सिंहासन हलवणं जरा अवघड ठरू शकतं, मारुती सुझुकीच्या गाड्यांमध्ये दर्जा आणि सेफ्टीबाबत नेहमीच प्रश्न निर्माण झाला आहे, कंपनीच्या बहुतांश गाड्या सेफ्टीच्या दृष्टीने कमकुवत झाल्या आहेत.

त्यामुळे आता ग्राहक इतर ब्रँडकडे वळत आहेत.. एक काळ असा होता की मारुती सुझुकीकडे सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप 10 गाड्यांमध्ये सर्वाधिक गाड्या होत्या, पण आता ही संख्या कमी होत आहे. आजकाल ग्राहक पैशाचे मूल्य गांभीर्याने घेत आहेत, म्हणून टाटा, महिंद्रा आणि ह्युंदाई सारख्या ब्रँडकडून कार खरेदी करण्यात स्वारस्य दाखवत आहे.

जिमनी 7 जूनला येणार !

रिपोर्ट्सनुसार, मारुती सुझुकी 7 जून रोजी आपली जिमनी भारतात लॉन्च करू शकते. हे फक्त दोन व्हेरियंटमध्ये येईल ज्यात मॅन्युअल आणि AMT समाविष्ट असेल. डिझाईनच्या बाबतीत, ते अधिक चांगले दिसते आणि त्यात स्पेस देखील चांगला आहे. असे सांगितले जात आहे की, कंपनी 10 लाखांच्या आत लॉन्च करू शकते. हे शहरापासून महामार्गापर्यंत आणि रस्त्याच्या व्यतिरिक्त वापरता येते. नव्या जिमनीचा परफॉर्मन्स कसा आहे याबाबत सध्या तरी कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

मायलेजचाही झाला खुलासा..

मारुती Jimny मध्ये 1.5L पेट्रोल इंजिन आहे, जे मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनला जोडलेले आहे. ARAI च्या मते, जिमनीचे मॅन्युअल व्हेरियंट 16.94km प्रति लिटर (MT) मायलेज देते, तर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह, त्याचे मायलेज 16.39km (AT) प्रति लिटर इंधनावर येते. जिमनी फक्त दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध असेल, ज्यामध्ये Zeta MT/AT आणि अल्फा MT/AT. नवीन जिमनीमध्ये 4WD ऑप्शन उपलब्ध असेल.

यामध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि 4 – स्पीड टॉर्क कन्व्हर्टर अँटोमॅटिक युनिटचा समावेश आहे. इतकेच नाही तर सुझुकीची ऑलग्रिप प्रो 4×4 ड्राइव्हट्रेन स्टॅंडर्ड म्हणून उपलब्ध आहे. ही SUV दोन व्हेरियंट येईल – Zeta आणि Alpha. भारतात हे 7 कलर ऑप्शनमध्ये सादर केले जाईल. यात 15 इंची अलॉय व्हील्स मिळतील.

जिमनी थारचा रथ रोखू शकेल का ?

महिंद्रा थार भारतात खूप लोकप्रिय आहे आणि तीची क्रेझही वाढत आहे. हे 2WD आणि 4WD ऑप्शनमध्ये येते, ग्राहक त्यांच्या गरजेनुसार खरेदी करू शकतात. महिंद्र थार पेट्रोल आणि डिझेल इंजिन ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. पेट्रोल व्हेरियंटमध्ये 2.0-लिटर क्षमतेचे इंजिन आहे, जे 150PS पॉवर जनरेट करते आणि 2.2-लिटर डिझेल इंजिन 130PS पॉवर जनरेट करते. या SUV ने ग्लोबल NCAP क्रॅश टेस्ट दरम्यान 4 स्टार मिळवले आहेत, त्यामुळे सेफ्टीच्या दृष्टीनेही ती खूपच चांगली आहे.

असे सांगितले जात आहे की, महिंद्रा आपले थार 1.5L इंजिनमध्ये देखील लॉन्च करण्याच्या तयारीत आहे, आता असे झाल्यास जिमनीचा प्रवास थोडा कठीण होऊ शकतो, जरी 30 हजारांहून अधिक बुकिंग झाले असले तरी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *