Take a fresh look at your lifestyle.

एका चार्जमध्ये 190 Km पर्यंत चालणारी इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च !

0

शेतीशिवार टीम : 19 मार्च 2022 : भारतात इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ वाढत असून यावरही, इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय ईव्ही (EV) स्पेसमध्ये सर्वाधिक वर्चस्व गाजवताना दिसून येत आहे. हे पाहता अनेक ईव्ही (EV) स्टार्टअप्सनी या क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. आग्रा – आधारित इलेक्ट्रिक वाहन उत्पादक NIJ ऑटोमोटिव्ह (NIJ Automotive) ने भारतात Accelero+ इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. NIJ Automotive Accelero+ च्या किंमती बद्दल बोलायचं झालं तर ही इलेक्ट्रिक स्कुटर 53,000 रुपयांपासून सुरू होऊन आणि बॅटरी पॅकच्या व्हेरियंटनुसार 98,000 रुपयांपर्यंत (Ex-showroom) जात आहे.

3 बॅटरी ऑप्शन अन् ड्रायव्हिंग रेंज :-

NIJ Automotive Accelero+ इलेक्ट्रिक स्कूटरला एकतर वाल्व रेग्युलेटेड लीड-ऍसिड (VRLA) किंवा लिथियम फेरो फॉस्फेट (LFP) बॅटरी पॅकसह ऑफर केली जातं आहे. लीड-ऍसिड बॅटरी पॅक फक्त एकाच व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. LFP बॅटरी पॅक तीन ऑप्शनमध्ये ऑफर केली जाते. 1.5kW (48V), 1.5kW (60W) आणि ड्युअल बॅटरी 3kW (48V).

NIJ Accelero+ मध्ये तीन राइडिंग मोड उपलब्ध आहेत. यापैकी, सर्वात एफिशिएंट मोडमध्ये, पूर्ण चार्जिंगवर इलेक्ट्रिक स्कूटर 190 किमी पर्यंत चालवता येते. हा दावा केलेला रेंज आकडा केवळ इको मोडमध्ये ड्युअल लिथियम फेरो फॉस्फेट बॅटरी सेटअपसह प्राप्त केला जाऊ शकतो. तर सिटी राइडिंग मोडमध्ये हा आकडा 120 किमी आहे.

पहा, लुक, फीचर्स आणि कलर ऑप्शन :-

कंपनीने ही स्कूटर इंपीरियल रेड, ब्लॅक ब्युटी, पर्ल व्हाइट आणि ग्रे टचमध्ये लॉन्च केली आहे. या स्कूटरमध्ये ड्युअल एलईडी हेडलॅम्प देण्यात आले आहेत, ज्यामुळे त्याचा लूक खूपच आकर्षक आहे. याशिवाय एलईडी डीआरएल आणि बूमरँग स्टाइल एलईडी इंडिकेटरही उपलब्ध आहेत. NIJ Accelero+ च्या फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर, यात डिजिटल स्पीडोमीटर, USB चार्जिंग, रिव्हर्स असिस्ट आणि सहज उपलब्ध चार्ज पोर्ट यांचा समावेश आहे.

बॅटरी चार्जिंग :-

लीड-ऍसिड बॅटरी पॅक 3A पॉवर सॉकेटमध्ये प्लग करून चार्ज केला जाऊ शकतो. ही बॅटरी 6 ते 8 तासांत पूर्ण चार्ज होते. लिथियम फेरो फॉस्फेट बॅटरी पॅक 6A सॉकेटमध्ये प्लग केल्यावर 3 ते 4 तासांत चार्ज होऊ शकते. स्कूटरमध्ये मोटरसाठी साइन वेव्ह कंट्रोलर आहे.

सस्पेंशन आणि ब्रेकिंग :-

इलेक्ट्रिक Accelero+ स्कूटरला सस्पेन्शनसाठी पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्क आणि मागील बाजूस ड्युअल शॉक एब्जॉर्बर मिळतात. ब्रेकिंगसाठी, समोर 180 मिमी डिस्क देण्यात आली आहे आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक उपलब्ध आहेत.

साइज आणि ग्राउंड क्लीयरन्स :-

NIJ Accelero+ ची लांबी 1,720 मिमी, रुंदी 690 मिमी आणि उंची 1,100 मिमी आहे. Accelero+ इलेक्ट्रिक स्कूटरचा व्हीलबेस 1,280 mm आणि ग्राउंड क्लीयरन्स 175 mm आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरचे वजन 86 किलो आहे आणि ते जास्तीत जास्त 150 किलो वजन उचलू शकते. Accelero+ चढू शकणारी कमाल चढाई 12 डिग्री आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.