Take a fresh look at your lifestyle.

Scorpio 2022 चा पहिला जबरदस्त लूक ; पहा, फीचर्स, केबिन आणि सर्वकाही…

0

शेतीशिवार टीम, 19 मार्च 2022 : भारतातील महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra) कंपनी सगळ्यात नवीन अन् युनिक स्कॉर्पिओ (New Scorpio) इंडियन मार्केटमध्ये लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. नवीन जनरेशनच्या SUV ची अनेक दिवसांपासून लोकांच्या मनात एक प्रतीक्षा निर्माण झाली होती आणि कंपनीने ही दमदार कार अनेक नवीन फीचर्स सह लॉन्च करणार आहे.

नवीन स्कॉर्पिओ मॉडेलची अनेक महिन्यांपासून टेस्ट सुरू असून काही दिवसांपूर्वी,भारतातील सर्वात दुर्गम रस्त्यांपैकी एक असलेल्या स्पिती व्हॅलीमध्ये नवीन स्कॉर्पिओ दिसून आली आहे. महिंद्रा याला पूर्णपणे नवीन अवतारात सादर करणार आहे जी दिसायलाही जबरदस्त असणार आहे, याशिवाय याची राईड पण मजबूत असणार आहे.

स्कॉर्पिओ स्टिंग किंवा महिंद्रा स्कॉर्पियन असं नाव दिलं जाऊ शकतं…

अलीकडे, स्कॉर्पिओमध्ये एक नवीन फीचर्स जोडलं गेलं आहे, हे ‘सिक्वेंशियल टर्न इंडिकेटर्स’ आहेत जे बहुतेक वेळा महागड्या कार्समध्ये दिसून येतात. नवीन जनरेशन म्हणजे 2022 मध्ये महिंद्रा स्कॉर्पिओ भारतात टेस्ट दरम्यान अनेक वेळा दिसली आहे. काही दिवसांपूर्वी ही माहिती समोर आली आहे की, कंपनी याला नवीन नावाने आपल्या देशात सादर करू शकते.

एका मीडिया रिपोर्टनुसार, महिंद्राची नवीन स्कॉर्पिओ तसेच स्कॉर्पिओ स्टिंग किंवा महिंद्रा स्कॉर्पियन या नावाने मार्केटमध्ये आणली जाऊ शकते. महिंद्राने नवीन स्कॉर्पिओसह सध्याच्या मॉडेलची विक्री सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ नवीन स्कॉर्पिओ सध्याच्या मॉडेलची रिप्लेस घेणार नसल्याचं दिसून येतंय.

नवीन स्कॉर्पिओ सेफ्टीच्या दृष्टीने उत्कृष्ट :-

2022 मधली महिंद्रा स्कॉर्पिओला मिळणार्‍या इतर फीचर्स पैकी सर्वात महत्त्वाचे म्हणजे अलीकडेच लाँच झालेल्या ‘Mahindra XUV700’ मध्ये पाहिल्याप्रमाणे एडवांस्ड ड्राइवर असिस्टेंस सिस्टम असू शकतं.

कारच्या टॉप मॉडेलमध्येही हे फिचर्स असण्याची शक्यता आहे. येथे ग्राहकांना 10-स्पीकर ऑडिओ सिस्टीम, 9 – इंचची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम,सर्वत्र एलईडी लाईट्स, 6 एअरबॅग्ज आणि कनेक्टेड कार टेकनिक यांसारखी हाय-टेक फीचर्स देखील मिळू शकतात. कंपनी या कारसोबत 360-डिग्री कॅमेरा देखील देणार आहे, ज्यामुळे नवीन स्कॉर्पिओ सेफ्टीच्या दृष्टीने एक उत्तम SUV बनणार आहे.

2.0 – लीटर mHawk टर्बो पेट्रोल :-

तसेच आता SUV मध्ये मल्टी फंक्शनल स्टीयरिंग व्हील,ऑटो मॅटिक क्लाइमेट कंट्रोल, पॅनोरॅमिक सनरूफ आणि वायरलेस चार्जिंग यांसारखे फीचर्स मिळू शकतात.

नवीन जनरेशन स्कॉर्पिओ 155 bhp पॉवर आणि 360 Nm पीक टॉर्क बनवणाऱ्या 2.0-लीटर mHawk टर्बो पेट्रोलसह आणि 2.0-लिटर 4-सिलेंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनसह 150 bhp पॉवर आणि 300 Nm पीक टॉर्क बनवते. कंपनी या दोन्ही इंजिन ऑप्शनसह 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देऊ शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.