शेतीशिवार टीम, 5 डिसेंबर 2021 : आजच्या काळात बहुतेक लोक ब्लड प्रेशर च्या समस्येने त्रस्त आहेत. ही समस्या अशा लोकांना जास्त जाणवते जे शारीरिक कमी क्रियाशील असतात आणि एकाच जागी बराच वेळ राहतात. अयोग्य आहार आणि खराब खाण-पिणं हे देखील ब्लड प्रेशर कमी-जास्त होण्याचे सर्वात मोठे कारण आहे. जर तुम्हाला बहुतेक वेळा अशक्तपणा जाणवत असेल किंवा थकवा जाणवत असेल तर तुम्हाला ‘लो ब्लड प्रेशर’ असू शकतो.
जेव्हा ब्लड शुगर लेवल 72 मिग्रा/डीएल च्या खाली येतं, तेव्हा अशा स्थितीला ‘हायपोग्लाइसेमिया’ किंवा ‘लो ब्लड शुगर’ असं म्हणतात. आपल्या शरीरातील ब्लड शुगर लेवल 80-110 मिग्रा/डीए असतं .आणि 90 मिग्रा/डीएल ही सुद्धा सरासरी ब्लड शुगर लेवल मानली जाते. हा आजार वेळीच आटोक्यात आणला नाही तर तो किडनी, हार्ट आणि लिवर साठी धोकादायक ठरू शकतो.
जर तुमचा ब्लड प्रेशर अचानक कमी झाला तर घाबरून जाण्याची गरज नाही, फक्त या गोष्टींचे सेवन करावं. यामुळे तुम्हाला काही वेळातच आराम मिळेल.
1) लिंबूपाणी प्यावं :-
लिंबूमध्ये असे घटक असतात जे रक्तवाहिन्या मऊ करण्यास मदत करतात, ज्यामुळे तुमचा ब्लड प्रेशर नॉर्मल होन्यासा मदत होते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही सकाळी आणि दुपारी याचे सेवन करू शकता. यामुळे तुमचा रक्तदाब कायम नियंत्रणात राहील.
2) लगेचच गोड पदार्थ खा :-
जर तुमचा ब्लड प्रेशर अचानक कमी झाला असेल तर लगेच चॉकलेट, लाडू किव्हा गूळ अश्या गोड पदार्थांचं सेवन करा, काही वेळात बीपी नॉर्मल होईल.
3) कॉफी :-
ज्या लोकांना लो ब्लड प्रेशरची समस्या असते. ते लोक कॉफी पिऊ शकतात. तुम्ही दूध किंवा ब्लॅक कॉफी देखील पिऊ शकता. याचा फायदा तुम्हाला लवकरच मिळेल.
5) केळी, पपई खा :-
केळी आणि पपईमध्ये पोटॅशियम चांगल्या प्रमाणात आढळून येते, जे सोडियमचा प्रभाव कमी करण्यास मदत करते. त्यामुळे जेव्हा तुमचा ब्लड प्रेशर कमी असेल तेव्हा केळी किंवा पपई खा.
6) तुळशीची पाने चावा :-
सकाळी तुळशीची पाने चघळणे खूप चांगले मानले जाते. याशिवाय तुमचा रक्तदाब अचानक कमी होत असेल तर तुळशीची काही पाने चावून खा. दररोज रिकाम्या पोटी तुळशीची 10-15 पाने बारीक करून त्याचा रस काढा आणि एक चमचा मधासोबत खा.