IPL 2022 : IPL विजेता अन् उपविजेता संघावर बक्षिसांचा वर्षाव ; एकूण 12 पुरस्कारांपैकी एकट्या जॉस बटलरने पटकवले 6 पुरस्कार !
शेतीशिवार टीम, 30 मे 2022 : IPL 2022 अंतिम टप्प्यात पोहचलं. फायनल सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झाला. 29 मे रोजी झालेल्या विजेतेपदाच्या लढतीत गुजरातने राजस्थानचा 7 विकेट राखून पराभव केला. या सामन्यानंतर पारितोषिक वितरण समारंभ (Prize giving ceremony in ipl ) पार पडला, ज्यामध्ये चॅम्पियन संघ गुजरात आणि अंतिम पराभूत संघ राजस्थान यांना बक्षीस रक्कम देण्यात आली. यासोबतच अनेक पुरस्कारही देण्यात आले.
गतवर्षीप्रमाणे यंदाही आयपीएल (IPL) जिंकणाऱ्या संघाला 20 कोटी रुपये देण्यात आले. त्याचबरोबर अंतिम फेरीत पराभूत होणाऱ्या संघाच्या बक्षीस रकमेत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. गेल्या वर्षी ही रक्कम 12.5 कोटी रुपये होती, ती तशीच ठेवण्यात आली आहे.
स्टेज | टीमला मिळालेलं बक्षीस (रक्कम) | |
---|---|---|
विजेता | 20 कोटी | गुजरात टाइटंस |
उपविजेता | 12.5 कोटी | राजस्थान रॉयल्स |
जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगच्या 15 व्या आवृत्तीत अनेक मनोरंजक सामने पाहायला मिळाले. यामध्ये अनेक नवे खेळाडूही उदयास आले आणि त्यांचे आयुष्य बदललं. आयपीएलमध्ये (IPL) खर्च केलेल्या रकमेवरून ही लीग नेहमीच चर्चेत असते. संघांना मिळालेल्या बक्षीस रकमेव्यतिरिक्त, अनेक पुरस्कार देखील दिले जातात. यामध्ये ऑरेंज कॅप, पर्पल कॅप, फेअर प्ले अवॉर्ड ई. पुरस्कारांचा समावेश आहे. आपण आता या सर्व पुरस्कारांबद्दल आणि त्यात दिल्या जाणाऱ्या पारितोषिकांच्या रकमेबद्दल जाणून घेणार आहोत..
अवॉर्ड | प्राइज मनी (रुपये) |
किसे मिला अवॉर्ड |
परफॉर्मेंस |
पर्पल कॅप विजेता | 10 लाख | युजवेंद्र चहल | 27 विकेट |
ऑरेंज कॅप विजेता | 10 लाख | जोस बटलर | 863 रन |
सुपर स्ट्राइकर ऑफ द सीजन | टाटा punch कार | दिनेश कार्तिक | 183.33 |
क्रैक इट सीक्सेज ऑफ द सीजन | 10 लाख | जोस बटलर | 45 षटकार |
पावर प्लेयर ऑफ द सीजन | 10 लाख | जोस बटलर | पावरप्ले मध्ये शानदार बॅटिंग |
मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ऑफ द सीजन | 10 लाख | जोस बटलर | सर्वात जास्त फँटसी प्वाइंट मिळवले |
गेम चेंजर ऑफ द सीजन | 10 लाख | जोस बटलर | अनेक सामने स्वबळावर फिरवले |
इमरजिंग प्लेयर ऑफ द सीजन | 10 लाख | उमरान मलिक | 22 विकेट |
फास्टेस्ट डिलिवरी ऑफ द सीजन | 10 लाख | लोकी फर्ग्यूसन | 157.3 Km / ता.वेग |
ऑन-द-गो 4s ऑफ द सीजन | 10 लाख | जोस बटलर | 83 चौकार |
फेयर प्ले अवॉर्ड | —- | गुजरात टाइटंस और राजस्थान रॉयल्स | —- |
कॅच ऑफ द सीजन | 10 लाख | एविन लुईस |
रिंकू सिंगचा झेल घेतला |
आयपीएल ऑरेंज कॅप (IPL ORANGE CAP) : संपूर्ण IPL हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला हा पुरस्कार दिला जातो.
फेअर प्ले अवॉर्ड (FAIR PLAY AWARD) : हा पुरस्कार संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक शिस्तीने खेळलेल्या आणि कोणतेही वाईट वर्तन न दाखविलेल्या संघाला दिला जातो.
सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन (Super Striker of the Season) : हा पुरस्कार संपूर्ण IPL स्पर्धेत सर्वाधिक स्ट्राइक रेट असलेल्या फलंदाजाला दिला जातो.
मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर (Most Valuable Player) : हा पुरस्कार IPL च्या संपूर्ण हंगामात फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूला दिला जातो.
आयपीएल पर्पल कॅप (IPL PURPLE CAP) : संपूर्ण IPL हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज हा या पुरस्काराचा विजेता आहे.
सर्वाधिक षटकारांचा पुरस्कार (MOST SIXES AWARD) : हा पुरस्कार मोसमात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजाला दिला जातो.
इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीझन (EMERGING PLAYER OF THE SEASON) : हा पुरस्कार सीझनमधील उगवत्या स्टारला दिला जातो. सनरायझर्स हैदराबादच्या उमरान मलिकला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांना 10 लाखांचा धनादेश देण्यात आला. उमरानच्या जागी शमीने हा पुरस्कार घेतला.
अंतिम सामन्यातील विजेते आणि बक्षीस वितरण :-
गेमचेंजर ऑफ द मॅच पुरस्कार : हार्दिक पंड्या : 1 लाख रुपये
लेट्स क्रिकेट सिक्स पुरस्कार: यशवी जैस्वाल : 1 लाख रुपये
पॉवरप्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार : ट्रेंट बोल्ट : 1 लाख रुपये
मोस्ट व्हॅल्यूएबल एसेट ऑफ द मॅच: हार्दिक पंड्या : 1 लाख रुपये
फास्टेस्ट डिलिवरी ऑफ द मॅच : लॉकी फर्ग्युसन : 1 लाख रुपये
ऑन-द-गो 4s ऑफ द मॅच : जोस बटलर : 1 लाख रुपये
प्लेयर ऑफ द मैच : हार्दिक पांड्या : 5 लाख रुपये