शेतीशिवार टीम, 7 मार्च 2022 : Petrol Diesel Price Today : दररोजच्या प्रमाणेच पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे रेट जाहीर केले आहेत. हा सोमवारही दिलासा देणारा निर्णय असून मंगळवारपासून उलथापालथ सुरू होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कारण, युक्रेन-रशियामधील भयंकर युद्धादरम्यान,आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल $128 ओलांडल्या गेल्या आहेत. मात्र, आता पुढील 8 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 10 ते 15 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
देशांतर्गत प्रत्येक स्तरावर सलग 122 दिवसांनंतरही पेट्रोल आणि डिझेलच्या रेट मध्ये दिलासा मिळाला आहे. हल्ली आज देशाची राजधानी दिल्लीमध्ये सुद्धा एक लिटर पेट्रोलची किंमत 95.41 रुपये आहे, तर डिझेलची किंमत 86.67 रुपये आहे. तर मुंबईत पेट्रोल 109.98 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 94.14 रुपये रेटने विकलं जात आहे.
नवीन रेटनुसार,आजही देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये 82.96 रुपये प्रति लिटर रेटने विकले जात आहे, तर डिझेलही येथे 77.13 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. त्याच वेळी, महानगरांमध्ये पेट्रोल मुंबईत सर्वात महाग असल्याचं दिसून येत आहे, तसेच 109.98 रुपये आणि दिल्ली सर्वात स्वस्त आहे 95.41 रुपये.त्याचवेळी भापाळ,जयपूर,पाटणा,कोलकाता,चेन्नई आणि बंगळुरूमध्ये पेट्रोल 100 च्या पुढे आहे.
उद्यापासून LPG सिलिंडरच्या किंमतींत होणार वाढ…
रशिया आणि युक्रेन यांच्यातील भीषण युद्धाचा परिणाम आता रस्त्यापासून तर स्वयंपाकघरापर्यंत दिसणार आहे. आतापर्यंत उत्तर प्रदेश, पंजाबसह 5 राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून LPG सिलिंडर आणि पेट्रोल-डिझेलच्या किमतीत दिलासा मिळत होता. आज निवडणुकीचा शेवटचा टप्पा संपला असून आज संध्याकाळपासून एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली आहे. या पाच राज्यांत कोणाचे सरकार येणार, याचा ढोबळ अंदाज बांधता येईल, पण आज रात्रीपासून पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी (LPG) सिलिंडरचे दर वाढणार आहेत.
निवडणुकीनंतर घरगुती सिलिंडर 100 ते 200 रुपयांनी महागणार ?
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीसाठी विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीत अनेक महिन्यांपासून दिलासा मिळाला आहे. कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $138 ओलांडल्या असूनही, 6 ऑक्टोबर 2021 पासून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. अशा परिस्थितीत निवडणुकीनंतर म्हणजेच 7 मार्चनंतर गॅसच्या दरात प्रति सिलेंडर 100 ते 200 रुपयांनी वाढ होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
1 मार्च रोजी सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी एलपीजीच्या (LPG) किमती वाढवल्या आहेत. कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किमती 105 रुपयांनी वाढल्या आहेत. त्याचबरोबर 5 किलो एलपीजी सिलिंडर छोटूच्या किमतीतही 27 रुपयांनी वाढ झाली आहे. दरम्यान, 2008 नंतर प्रथमच गॅस सरासरी US$4 प्रति गॅलनने वाढला आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दरही स्थिर आहेत. 3 नोव्हेंबर 2021 रोजी केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर पाच रुपये आणि डिझेलवर प्रति लिटर दहा रुपयांची कपात केली होती. यानंतर अनेक राज्य सरकारांनीही आपले कर कमी केले. त्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची सरासरी किंमत प्रति बॅरल 82 डॉलर होती. रशिया आणि युक्रेनमधील भांडणात कच्च्या तेलाने $128 चा टप्पा ओलांडला आहे.
कच्च्या तेलाच्या किमती लवकर खाली येण्याची शक्यता कमी…
कच्च्या तेलाच्या किमती लवकर कधीही खाली येण्याची शक्यता कमी आहे.
अपेक्षा नाही. कारण सर्वात मोठा उत्पादक असलेल्या सौदी अरेबियाने अमेरिकेच्या विनंतीनंतरही उत्पादनात वाढ केलेली नाही. अशा स्थितीत सध्या कच्च्या तेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता कमी आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपनीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे कंपन्या दबावाखाली आहेत. अशा परिस्थितीत लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होऊ शकते.