शेतीशिवार टीम, 18 फेब्रुवारी 2022 : देशातील सर्वात सर्वात स्वस्त 7- सीटर MPV ही Renault Triber ही ठरली आहे. या कारने 1 लाख युनिटचा मोठा टप्पा ओलांडला आहे. Renault Triber कंपनीने 2019 मध्ये लॉन्च केली होती.
Renault Triber 7-Seater MPV सध्या फक्त ₹5.76 लाख (Ex-showroom) च्या सुरुवातीच्या किमतीत विकली जाते. ही MPV एकूण चार व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये RXE, RXL, RXT आणि RXZ स्पेक मॉडेल्सचा समावेश आहे.
नवीन लिमिटेड एडिशनही झालं लॉन्च :-
1 लाखांहून जास्त विक्री झाल्याने याचं निमित्त साधून कंपनीने रेनॉल्ट ट्रायबरची लिमिटेड Renault Triber एडिशन लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. त्याची किंमत 7.24 लाख रुपये (Ex-showroom) पासून सुरू होणार आहे.
ट्रायबरच्या (Triber) लिमिटेड एडिशन व्हर्जनमध्ये डुअल-टोन कलर्स जोडले गेले आहेत. ब्लॅक कलरच्या रूफ सोबत ही कार ही दोन रंगांच्या ऑप्शनमध्ये येणार आहे. तो म्हणजे मूनलाइट सिल्व्हर आणि सीडर ब्राऊन…

कंपनीने सांगितलं आहे की, लिमिटेड एडिशन व्हर्जन लिमिटेड एडिशनमध्ये मध्ये बेस्ट-इन-क्लास टेक्नोलॉजी आणि आरामदायी डिझाइनसह सेफ्टी आणि कंफर्ट ऑफर करत आहे. या लिमिटेड एडिशन व्हर्जनमध्ये चार एअरबॅग देण्यात आल्या आहेत. इतर फीचर्समध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या रो – साठी एसी व्हेंट्सचा (AC vent) समावेश करण्यात आला आहे.
इंजिन आणि सेफ्टी फीचर्स जाणून घ्या..
लिमिटेड एडिशन ट्रायबर 1.0- लिटर पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे, जे मॅन्युअल आणि ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध असणार आहे. यात स्टीयरिंग माउंटेड ऑडिओ आणि फोन कंट्रोल्ससह सिक्स -वे अँडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि रिव्हर्स पार्किंग कॅमेरा यांसारखे फीचर्स मिळणार आहे.
कंपनीकडून सांगण्यात आलं आहे की, ट्रायबरला ग्लोबल NCAP कडून प्रौढां च्या सुरक्षेसाठी 4-स्टार सुरक्षा रेटिंग आणि 3-स्टार चाइल्ड ऑक्यूपेंट सेफ्टी मिळाली आहे.