Share Market : अवघ्या 6 महिन्यात गुंतवणूकदारांचं नशीब पालटलं ; ‘या’ शेयर्समध्ये तब्बल 150 % वाढ !

0

शेतीशिवार टीम, 3 डिसेंबर 2021 : शेअर बाजारात गुजरात फ्लुरोकेमिकल्स (Gujrat Flurochemicals) चे शेयर्स सलग तिसऱ्या दिवशी वधारले. त्यामुळे एका शेअरची किंमत शुक्रवारी 2,539.95 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली. गेल्या तीन दिवसांत कंपनीचे शेअर्स 29% वर चढले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा नफा झाला.

अवघ्या 6 महिन्यात गुंतवणूकदारांचं नशीब पालटलं :-

गेल्या सहा महिन्यांत गुंतवणूकदारांचे नशीब पालटलं आहे. यादरम्यान, BSE वर कंपनीच्या शेअर्समध्ये 150 % वाढ झाली आहे. जर आपण 6 महिने मागे गेलो आणि पूर्ण वर्ष बघितलं तर या कालावधीत 320 % ची उडी होती. 2021-22 आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत कंपनीने जबरदस्त नफा कमावला. या दरम्यान त्याचा निव्वळ नफा 142 पटीने वाढून 352.41 कोटी झाला आहे.

काय आहे या कंपनीचा बिझिनेस :-

आज गुंतवणूक केल्यास नफा मिळू शकतो की नाही ? तर आम्ही तुम्हाला सांगतो, ही कंपनी इलेक्ट्रिक वाहनांसाठी (EVs) केमिकल, बॅटरी, सौर पॅनेल आणि हायड्रोजन फ्यूल बनवते.

असा अंदाज आहे की, 2030 पर्यंत, EV बॅटरीची बाजारपेठ $300 अब्ज डॉलर्स इतकी असेल. अशा स्थितीत या कंपनीचा विस्तार होण्याची शक्यता आहे. टेस्ला, टाटा, महिंद्रा यांसारख्या कंपन्याही ईव्हीच्या (EVs) क्षेत्रात मोठी गुंतवणूक करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.