शेतीशिवार टीम,15 डिसेंबर 2021 :- शेयर मार्केटमध्ये योग्य शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास खूप चांगले रिटर्न्स मिळण्याची शक्यता वाढते. शेअर मार्केटमध्ये असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी लोकांना सहज करोडपती बनवले आहे. आज आम्ही तुम्हाला अशा एका शेअर्सबद्दल सांगणार आहोत, ज्याने अवघ्या एका वर्षात खूप जास्त रिटर्न्स दिले आहेत.
असाच एक पेनी स्टोक म्हणजे ब्राइटकॉम ग्रुप (Brightcom Group). ब्राइटकॉम ग्रुप च्या शेयर्सनी अवघ्या एका वर्षात गुंतवणूकदारांना श्रीमंत केलं आहे. कंपनीच्या शेयर्सनी गेल्या वर्षभरात 4700 % हुन अधिक रिटर्न्स दिले आहे.
1 लाखांचे झाले 48 लाखांपेक्षा जास्त :-
15 डिसेंबर 2020 रोजी ब्राइटकॉम समूहाचे (Brightcom Group) शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर 3.84 रुपयांच्या लेव्हलवर होते. 15 डिसेंबर 2021 रोजी कंपनीचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये (NSE) 185.95 रुपयांच्या लेव्हलवर ट्रेंड करत आहेत. कंपनीच्या शेयर्सनी एका वर्षात गुंतवणूकदारांना 4,742% रिटर्न्स दिले आहे.
जर एखाद्या व्यक्तीने गेल्या वर्षी 15 डिसेंबर रोजी ब्राइटकॉम ग्रुपच्या (Brightcom Group) शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर सध्या ही रक्कम 48.42 लाख रुपये झाली असती. म्हणजेच या गुंतवणुकीचा थेट 47 लाख रुपयांपेक्षा जास्त फायदा झाला असता…
6 महिन्यांत 1600% हून अधिक रिटर्न्स :-
ब्राइटकॉम ग्रुपच्या (Brightcom Group) शेयर्सनी गेल्या 6 महिन्यांत शानदार रिटर्न्स दिले आहेत. कंपनीच्या शेअर्सने सहा महिन्यांत गुंतवणूकदारांना 1654% रिटर्न्स दिले आहे. 15 जून 2021 रोजी कंपनीचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये (NSE) 10.60 रुपयांच्या लेव्हलवर होते.
15 डिसेंबर 2021 रोजी कंपनीचे शेअर्स 185.85 रुपयांवर पोहोचले आहेत. जर एखाद्या गुंतवणूकदाराने सहा महिन्यांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर त्याचे मूल्यांकन सध्या 17.55 लाख रुपये झाले असते.