Take a fresh look at your lifestyle.

1.2 लाखांहून अधिक विकली गेली ही हॅचबॅक कार, नवी डार्क अँडिशनही केली लॉन्च !

0

शेतीशिवार टीम, 13 फेब्रुवारी 2022 : जानेवारी 2020 मध्ये लाँच झालेल्या, Tata Altroz ​​ने मार्केटमध्ये प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये स्वतःसाठी एक मोठं स्थाननिर्माण केलं आहे. या सेगमेंट मध्ये Maruti Baleno हा या सेगमेंटमध्ये सर्वाधिक विकला जाणारा सेगमेंट आहे, तर दुसऱ्या क्रमांकासाठी Tata Altroz ​​आणि Hyundai i20 यांच्यात जोरदार टक्कर आहे.

टाटा (Tata) कडून सांगण्यात आलं आहे की,अल्ट्रोझने Altroz 1.2 लाख युनिट्सचा टप्पा ओलांडला आहे आणि 20 टक्क्यांहून अधिक बाजारपेठेचा हिस्सा आहे.

Tata Altroz ​​च्या दुस-या वर्धापनदिनानिमित्त कंपनीने XT आणि टॉप-स्पेक XZ+ डिझेल व्हेरियंटची डार्क एडिशन लॉंच केली आहे. याद्वारे, Altroz ​​ची डार्क एडिशन आता पूर्वीपेक्षा अधिक ऑप्शनमध्ये उपलब्ध होणार आहे. कंपनीने Altroz ​​XT Dark एडिशनची किंमत 7.96 लाख रुपये (Ex-showroom,दिल्ली) ठेवली आहे. Altroz ​​XZ+ डिझेल डार्क एडिशनची किंमत नंतर जाहीर केली जाणार आहे.

डार्क एडिशनमध्ये असं काय आहे खास..

पूर्वीच्या डार्क एडिशन व्हेरियंटप्रमाणे, या दोन्ही व्हेरियंटमध्ये अँक्सटीरियर आणि इंटेरियर भागात डार्क थीमचा वापर दिसून येतो. प्रमुख फीचर्समध्ये प्रीमियम कॉस्मो डार्क कलर, फ्रंट फेंडर्सवर स्पेशल डार्क मॅस्कॉट, गडद टिंट फिनिशसह R16 अलॉय व्हील आणि हुडवर क्रोमचा समावेश आहे.इंटेरियरमध्ये , Altroz ​​Dark Edition मध्ये प्रीमियम ग्रॅनाइट ब्लॅक इंटीरियर थीम आहे.

याशिवाय, हॅचबॅकमध्ये रियर आर्मरेस्ट आणि हेडरेस्ट, हाइट -अ‍ॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, लेदर सीट्स आणि लेदर रॅप्ड स्टीयरिंग व्हील आणि गियर-नॉबचा समावेश आहे. टॉप-स्पेक XZ+ डार्क व्हेरियंटमध्ये ब्रेक स्वे कंट्रोल आणि iTPMS (टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम) सारखी अतिरिक्त फीचर्स मिळणार आहे.

हे फीचर्स कारची सेफ्टी वाढवतात. सेफ्टीसाठी, यात ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, EBD सह ABS, कॉर्नर स्टॅबिलिटी कंट्रोल, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स आणि कॅमेरे, ऑटो हेडलॅम्प, पुल असिस्ट (अँटी-स्टॉल फीचर्स) आणि की लॉकआउट प्रोटेक्शन मिळतं.

इंजिन आणि ट्रान्समिशन :-

Altroz ​​XT Dark Edition मध्ये 1.2L पेट्रोल आणि 1.2L iTurbo पेट्रोलचे इंजिन ऑप्शन आहेत. पहिले इंजिन 86 PS ची कमाल पॉवर आणि 113 Nm चा पीक टॉर्क जनरेट करतं.तर, टर्बो पेट्रोल इंजिन जास्तीत जास्त 110 PS पॉवर आणि 140 Nm टॉर्क जनरेट करतं. Altroz ​​XZ+ डिझेल डार्क एडिशन 1.5-लिटर टर्बो डिझेल इंजिनद्वारे समर्थित असेल जे 90 PS आणि 200 Nm चे पॉवर देणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.