Take a fresh look at your lifestyle.

जगातील सर्वात वेगवान चार्जिंग होणारी EV ! 15 मिनिटांत फुल चार्ज, 100 Km रेंज अन् किंमतही स्वस्त, पहा डिटेल्स..

0

कमर्शियल इलेक्ट्रिक व्हीलर निर्माता अल्टिग्रीन Altigreen ने ₹ 3,55,000 च्या स्टार्टींग किमतीत 3 व्हीलर कार्गो EV neEV चा न्यू व्हेरियंट लॉन्च करण्यासाठी एक्सपोनंट एनर्जीसोबत भागीदारी केली आहे. neEV Tez नावाच्या नवीन व्हेरियंट मध्ये 8.2kWh बॅटरी पॅक दिला आहे. कार्गो ईव्ही टू-व्हीलर neEV Tez एका चार्जवर 98Km ची रेंज देते, तर त्याची सिटी ड्राईव्ह रेंज 85Km आहे.

या वाहनाचे फीचर्स म्हणजे ते एक्सपोनंटच्या ई-पंप चार्जिंग नेटवर्कवर 15 मिनिटांत 0 ते 100% चार्ज होऊ शकते. कंपनीचा दावा आहे की, यामुळे ते जगातील सर्वात वेगवान चार्जिंग इलेक्ट्रिक वाहन बनलं आहे.

15 मिनिटांत होणार 100% चार्ज..

NeEV Tez ला 5 वर्षे किंवा 1 लाख किलोमीटरची वाहन वॉरंटी आणि 5 वर्षे किंवा 1.56 लाख किलोमीटरची बॅटरी वॉरंटी मिळते. इलेक्ट्रिक वाहनांसाठी रॅपिड चार्जिंग विकसित करण्यासाठी अल्टिग्रीन आणि एक्सपोनंट या दोघांनी यापूर्वी ऑगस्ट 2022 मध्ये त्यांच्या भागीदारीची घोषणा केली होती.

या भागीदारीनंतर बनवलं जाणारं पहिलं उत्पादन neEV Tez आहे. यामध्ये एक्सपोनंटची प्रोप्रायटरी लिक्विड-कूल्ड बॅटरी आहे, जी केवळ 15 मिनिटांत बॅटरी 0-100% चार्ज करते.

कोणत्या ग्राहकांसाठी EV ठरू शकते फायदेशीर..

NeEV Tez ची रचना सर्व व्‍यवसाय मालकांना लक्षात घेऊन केली गेली आहे. बेंगळुरूमध्ये व्यावसायिकीकरणाच्या पहिल्या टप्प्याचा भाग म्हणून 20,000 neEV Tez लाँच करण्याचे कंपनीचं उद्दिष्ट आहे, तर Exponent चे बेंगळुरूपासून सुरू होणार्‍या प्रत्येक शहरात किमान 100 ई – पंप असण्याचे उद्दिष्ट आहे.

देशातील रस्त्यांची परिस्थिती आणि तापमान लक्षात घेऊन अल्टिग्रीन neEV कार्गो ईव्हीची रचना स्वदेशी पद्धतीने करण्यात आली आहे. ते इंटरसिटी आणि इंट्रासिटी वाहतूक लक्षात घेऊन डिझाइन केलेलं आहे. या क्रेगो ईव्ही आता हाय डेक, लो डेक आणि फास्ट या 3 व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.