शेतीशिवार टीम,14 एप्रिल 2022 :- जगातील सर्वात मोठी सिमेंट कंपनी Holcim Ltd. भारतातून आपला व्यवसाय बंद करण्याच्या तयारीत आहे. हे पाऊल प्रमुख बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करण्याच्या कंपनीच्या जागतिक धोरणाचा एक भाग असल्याचे सांगितलं जातं आहे.

कंपनीच्या सूत्रांनी सांगितले की, होल्सीम लिमिटेड (Holcim Ltd) आपल्या दोन सूचीबद्ध कंपन्या अंबुजा सिमेंट (Ambuja Cement) आणि एसीसी लिमिटेड (ACC Ltd.) विकणार आहे. एवढेच नाही तर होल्सीम लिमिटेडने या कंपन्यांना विक्रीसाठी ही ठेवलं आहे.

Holcim Ltd चा अंबुजा सिमेंट मध्ये 63.1% हिस्सा आहे, तर ACC Ltd मध्ये अंबुजाचा 50.05 % हिस्सा आहे. याशिवाय, होल्डरिंड इन्व्हेस्टमेंट (Holcim) कडे ACC Ltd मध्ये थेट 4.48% हिस्सा आहे. 2018 मध्ये, Holcim दोन ब्रँड विलीन करण्याचा प्रयत्न करत होता परंतु प्रक्रिया पूर्ण झाली नाही…

शर्यतीत अदानी (Adani) आणि जेएसडब्ल्यू (JSW) :-

‘इकॉनॉमिक टाईम्स’ या इंग्रजी वृत्तसंस्थेतील वृत्तानुसार, होल्सीम लिमिटेड (Holcim Ltd) आपला भारतीय व्यवसाय विकण्यासाठी अदानी समूह (Adani) आणि जेएसडब्ल्यूसह (JSW) अनेक कंपन्यांशी चर्चा करत आहे.

अदानी समूह आणि JSW यांनी अलीकडेच सिमेंट विभागात प्रवेश केला आहे. अशा स्थितीत होलसिमकडून (Holcim) विकल्या जाणाऱ्या सिमेंट कंपन्यांच्या खरेदीसाठी दोन्ही कंपन्या प्रयत्नशील आहेत. मात्र, अद्याप प्राथमिक टप्प्यात चर्चा सुरू आहे….

किती आहे, उत्पादन क्षमता (Production capacity)…

अंबुजा सिमेंट (Ambuja Cement) आणि ACC लिमिटेड, होल्सीम ग्रुपच्या दोन्ही सूचीबद्ध कंपन्या, यांची एकत्रित क्षमता वार्षिक 66 दशलक्ष टन आहे. बुधवारपर्यंत..

अंबुजा सिमेंट (Ambuja Cement) आणि एसीसी (ACC) लिमिटेडचे ​​एकत्रित बाजार भांडवल 1.14 लाख कोटी रुपये होते. आदित्य बिर्ला समूहाची अल्ट्राटेक (Ultratech) ही सध्या भारतीय सिमेंट बाजारपेठेतील सर्वात मोठी कंपनी आहे.

अल्ट्राटेक दरवर्षी 117 दशलक्ष टन सिमेंटचे उत्पादन करते. जी कंपनी अंबुजा आणि एसीसी सिमेंट विकत घेईल, ती भारतीय सिमेंट बाजारात नंबर दोनवर येईल. यामुळेच JSW आणि अदानीसह श्री सिमेंट या दोन हॉल्सिम ग्रुप कंपन्यांमध्ये रस दाखवत आहेत, असे सूत्रांकडून समजलं आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *