Take a fresh look at your lifestyle.

UPSC Tricky Interview Questions : असा कोणता प्रश्न आहे, त्याचं उत्तर नेहमी बदलत राहतं ?

0

शेतीशिवार टीम, 30 जानेवारी 2022 : UPSC / MPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा आहे. जे उत्तीर्ण होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. आणि जो या परीक्षेत उत्तीर्ण होतो तो देशाचा (IAS) अधिकारी होतो. या परीक्षेचे एकूण तीन टप्पे आहेत. ज्यामध्ये लेखी बरोबर इंटरव्हिव्ह हि घेतला जातो. प्रत्येकजण लेखी परीक्षा पास तर होतो पण इंटरव्हिव्ह मध्ये अडकतात.

खरं तर असे अनेक प्रश्न या UPSC / MPSC इंटरव्यू दरम्यान विचारले जातात. ज्याची उत्तरे प्रत्येकाच्या डोक्यात बसत नाहीत. हे प्रश्न खूप गुंतागुंतीचे आणि गुंफलेले असतात. भल्याभल्यांचं मन हेलावतं. तर आज आम्ही या पोस्टमध्ये तुमच्यासाठी असेच काही प्रश्न घेऊन आलो आहोत जे तुम्हाला इंटरव्हिव्ह मध्ये अन् परीक्षेमध्ये खूप मदत करू शकतात.

प्रश्न : ऑट्टोमन साम्राज्याचं (Ottoman Empire) पतन कोणत्या वर्षी झालं ?
उत्तर : 1917 मध्ये पहिल्या महायुद्धानंतर,ऑट्टोमन साम्राज्याचं (Ottoman Empire) पतन झालं आणि नंतर ब्रिटनने पॅलेस्टाईनचा ताबा घेतला.

प्रश्न : भारतातील पहिलं अँप्युटी क्लिनिक (First ever amputee clinic) कोणी उघडलं ?
उत्तर : भारतातील पहिले अँप्युटी क्लिनिक (First ever amputee clinic) पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च, चंदीगडने उघडलं आहे.

प्रश्न : मिस युनिव्हर्स 2020 चा ‘किताब कोणी जिंकला ?
उत्तर : मिस मेक्सिको अँड्रिया मेझा (Andrea Meza) ने मिस युनिव्हर्स 2020 चा किताब जिंकला.

प्रश्न : भारतातील सर्वात जास्त क्षमतेचा अणुऊर्जा प्रकल्प कोणता आहे ?
उत्तर : तामिळनाडूमधील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प हा भारतातील 2000 मेगावॅट क्षमतेचा सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प आहे.

प्रश्न : आशियातील पहिली अणुभट्टी कोणती होती ?
उत्तर : आशियातील पहिल्या अणुभट्टीला ‘अप्सरा’ म्हणतात. हे 4 ऑगस्ट 1956 रोजी भाभा अणु संशोधन केंद्राच्या ट्रॉम्बे कॅम्पसमध्ये बांधले गेले. BARC च्या वेबसाइटनुसार, त्याचे उद्घाटन 20 जानेवारी 1957 रोजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते करण्यात आलं.

प्रश्न : अनुशीलन समितीचे संस्थापक कोण होते ?
उत्तर : अनुशीलन समितीची स्थापना बरिंद्र कुमार घोष आणि जतींद्रनाथ बॅनर्जी यांनी केली होती.

प्रश्न : जालियनवाला बाग घटना कधी घडली ?
उत्तर : जालियनवाला बाग हत्याकांड, ज्याला ‘अमृतसर नरसंहार’ असेही म्हणतात, 13 एप्रिल 1919 रोजी घडलं .

प्रश्न : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे भरलं होतं ?
उत्तर : INC चे पहिले अधिवेशन 28-30 डिसेंबर 1885 दरम्यान मुंबई येथे झालं.

प्रश्न : जागतिक जल दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर :  जागतिक जल दिन दरवर्षी 22 मार्च रोजी साजरा केला जातो.

प्रश्न : आंतरराष्ट्रीय शांतता दिवस कधी साजरा केला जातो ?
उत्तर : 21 सप्टेंबर

प्रश्न : असा कोणता जीव आहे, त्याला एकही हाड नाही ?
उत्तर : शार्क माशाच्या (Shark fish) शरीरात हाड नसतं.

प्रश्न : फाशी दिल्यानंतर आरोपीच्या मृतदेहाचे काय केलं जातं ?
उत्तर : आरोपीला फाशी दिल्यानंतर गुन्हेगाराला कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त दोन तास फासावर लटकवलं जाते. 2 तासानंतर वैद्यकीय पथक मृतदेहाची तपासणी करून त्याला मृत घोषित करतात. त्यानंतर त्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करण्यात येतं. यानंतर मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवायचा की नाही ? हे सरकारवर अवलंबून असतं.

प्रश्न : असा कोणता प्रश्न आहे, त्याचं उत्तर नेहमी बदलत राहतं ?
उत्तर : वेळ किती झाली आहे ? या प्रश्नाचे उत्तर नेहमी बदलत राहतं ?

प्रश्न : 500 / 2000 रुपयांच्या नोटा छापण्यासाठी RBI ला किती खर्च येतो ?
उत्तर : रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात सांगितलं आहे की, 2000 रुपयांची नोट छापण्यासाठी सरकारला 4.18 रुपये खर्च येतो. 500 रुपयांची नोट छापण्यासाठी 2.57 रुपये खर्च येतो. तर 100 रुपयांची नोट छापण्यासाठी 1.51 रुपये खर्च येतो.

प्रश्न : अशी कोणती गोष्ट आहे, जी पुरुषाने एकदा केल्यानंतर स्त्री पुन्हा-पुन्हा करते ?
उत्तर : भांगेत सिंदूर भरणं.

Leave A Reply

Your email address will not be published.