GK Tricky Question : नोबेल पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय नागरिक कोण होते ?

0

शेतीशिवार टीम, 24 फेब्रुवारी 2022 : UPSC / MPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा आहे. जे उत्तीर्ण होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. आणि जो या परीक्षेत उत्तीर्ण होतो तो देशाचा (IAS) अधिकारी होतो. या परीक्षेचे एकूण तीन टप्पे आहेत. ज्यामध्ये लेखी बरोबर इंटरव्हिव्ह हि घेतला जातो. प्रत्येकजण लेखी परीक्षा पास तर होतो पण इंटरव्हिव्ह मध्ये अडकतात.

खरं तर असे अनेक प्रश्न या UPSC / MPSC इंटरव्यू दरम्यान विचारले जातात. ज्याची उत्तरे प्रत्येकाच्या डोक्यात बसत नाहीत. हे प्रश्न खूप गुंतागुंतीचे आणि गुंफलेले असतात. भल्याभल्यांचं मन हेलावतं. तर आज आम्ही या पोस्टमध्ये तुमच्यासाठी असेच काही प्रश्न घेऊन आलो आहोत जे तुम्हाला इंटरव्हिव्ह मध्ये अन् परीक्षेमध्ये खूप मदत करू शकतात.

प्रश्न : वातावरणात कोणत्या वायूचे सर्वाधिक प्रमाण जास्त आहे?
उत्तर : नायट्रोजन.

प्रश्न : बांगलादेशाची स्थापना 1971 साली कोणत्या देशापासून विभक्त होऊन झाली?
उत्तर : पाकिस्तान.

प्रश्न : कंप्यूटर भाषामध्ये WWW चा अर्थ नेमका काय आहे?
उत्तर : वर्ल्ड वाइड वेब. (World Wide Web)

प्रश्न : एक किलोबाइट (KB) मध्ये किती बाइट्स असतात?
उत्तर : 1024 बाइट्स.

प्रश्न : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 1929 च्या ऐतिहासिक अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषवले?
उत्तर : जवाहरलाल नेहरू.

प्रश्न : सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकण्यात भगतसिंग यांचा साथीदार कोण होता?
उत्तर: बटुकेश्वर दत्त.

प्रश्न : मुस्लिम समाजाने भारताच्या फाळणीची पहिली मागणी केव्हा केली ?
उत्तर: 1940.

प्रश्न : राष्ट्रकुल मासिक कोणी प्रकाशित केले?
उत्तर : बेझंट.

प्रश्न : अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळालेला एकमेव भारतीय व्यक्ती कोणता?
उत्तर : अमर्त्य सेन.

प्रश्न : 1856 मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा कोणाच्या प्रयत्नाने झाला?
उत्तर : ईश्वरचंद्र विद्यासागर.

प्रश्न : लॉर्ड कॅनिंगने नोव्हेंबर 1858 मध्ये भरलेल्या दरबारात भारतातील राजवटीची घोषणा कोठे केली?
उत्तर : अलाहाबाद येथे झालेल्या दरबारात.

प्रश्न : कोणत्या राज्याच्या शासकाने लॉर्ड वेलस्लीशी पहिला सहायक करार केला?
उत्तर : हैदराबादचा निजाम.

प्रश्न : भारतातील सर्वात मोठी जमात कोणती आहे?
उत्तर : गोंड.

प्रश्न : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या?
उत्तर : ऐनी बेसेन्ट

प्रश्न : ‘शहीद-ए-आझम’ म्हणून कोणाला ओळखले जाते?
उत्तर : भगतसिंग

प्रश्न : कोणत्या योजनेमुळे भारताची फाळणी झाली?
उत्तर : माउंटबॅटन योजनेचा परिणाम म्हणून.

प्रश्न : जनरल डायर’ची हत्या कोणी केली?
उत्तर : उधम सिंग.

प्रश्न : बंगाल देशाची फाळणी केव्हा व कोणी केली?
उत्तर : 1905 मध्ये इ.स गव्हर्नर लॉर्ड कर्झन यांनी केली.

प्रश्न : भारतात एकूण किती उच्च न्यायालये आहेत?
उत्तर : 24.

प्रश्न : पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष कोण होते?
उत्तर : जी. व्ही. मावळंकर.

प्रश्न : संविधान सभेचे अस्थायी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली?
उत्तरः सच्चिदानंद सिन्हा

प्रश्न : कुचीपुडी नृत्यशैली प्रामुख्याने कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
उत्तर : आंध्र प्रदेश.

प्रश्न : मोहिनीअट्टम नृत्यशैली प्रामुख्याने कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
उत्तर : केरळ.

प्रश्न : भरतनाट्यम नृत्यशैली प्रामुख्याने कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
उत्तर : तामिळनाडू.

प्रश्न : कथकली हे कोणत्या राज्यातील शास्त्रीय नृत्य आहे?
उत्तर : केरळ.

प्रश्न : केशर’चे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते?
उत्तर : जम्मू आणि काश्मीर.

प्रश्न : भारतातील पहिला बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवर बांधला गेला?
उत्तर : दामोदर नदी .

प्रश्न : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते?
उत्तर : वोमेशचंद्र बॅनर्जी.

प्रश्न : गांधीजी कोणाला आपले राजकीय गुरू मानत होते?
उत्तर : गोपाळकृष्ण गोखले.

प्रश्न : आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचे कोणते अंग जबाबदार आहे?
उत्तर : सुरक्षा परिषद.

प्रश्न : नोबेल पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय नागरिक कोण होते?
उत्तर : रवींद्रनाथ टागोर (1913 मध्ये)

प्रश्न : मिड डे मील योजना कोणत्या वर्षी सुरू झाली?
उत्तर : भारतात ही योजना 1995 साली राष्ट्रीय स्तरावर सुरू झाली.

प्रश्न : बांगलादेशचे राष्ट्रगीत कोणते आहे आणि ते कोणी लिहिले आहे?
उत्तर : रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेला ‘अमर सोनार बांगला’.

प्रश्न : लोधी घराण्याचे संस्थापक कोण होते?
उत्तर : बहलोल लोधी.

प्रश्न : कोणत्या घटनादुरुस्तीला ‘मिनी संविधान’ म्हणतात
उत्तर : 42 वा.

प्रश्न : गोताखोर पाण्यामध्ये श्वास घेण्यासाठी वायूंचे कोणते मिश्रण वाहून नेतात?
उत्तर : ऑक्सिजन आणि हेलियम वायूंचे मिश्रण.

प्रश्न : होमिओपॅथीचे संस्थापक कोण होते?
उत्तर : हॅनेमन.

प्रश्न : फळे पिकवण्यासाठी कोणता वायू वापरला जातो?
उत्तर : इथिलीन.

प्रश्न : भारतीय राष्ट्रीय कलेंडरचा पहिला महिना कोणता आहे?
उत्तर : चैत्र.

प्रश्न : पं.हरिप्रसाद चौरसिया कोणतं वाद्य वाजवतात?
उत्तर : बासरी.

प्रश्न : भारताचे पंतप्रधान होण्यासाठी कमीत-कमी वय किती असावे?
उत्तर : 25 वर्षे.

प्रश्न : सांचीचा स्तूप कोणी बांधला?
उत्तरःसम्राट अशोक.

प्रश्न : कांद्यामध्ये खाण्यायोग्य भाग कोणता आहे?
उत्तर: स्टेम.

प्रश्न  :ऑडिओ रेंजमध्ये ध्वनी लहरींची वारंवारता किती असते?
उत्तर: 20 Hz से 20000 Hz

प्रश्न : मधुबनी ही कोणत्या राज्यातील लोक चित्रकला शैली आहे?
उत्तर : बिहार.

प्रश्न : जगातील सर्वात उंच पर्वत शिखर माउंट एव्हरेस्ट कोणत्या देशात आहे?
उत्तर : नेपाळ.

प्रश्न : भारताचा शेक्सपियर कोणाला म्हणतात?
उत्तर : कालिदास.

प्रश्न : संगणकाचा जनक कोणाला म्हणतात?
उत्तर : चार्ल्स बॅबेज.

प्रश्न : अंतराळवर जाणारी पहिली व्यक्ती कोण होती?
उत्तर: युरी गागारिन (रशिया).

प्रश्न – भारतातील सर्वात जास्त भुईमूगाचं उत्पादक असलेलं राज्य कोणतं ?
उत्तर – गुजरात

प्रश्न – 24 तासांमध्ये हत्ती किती तास झोपतो ?
उत्तर – हत्ती दिवसात सुमारे 4 ते 5 तास झोपतो.

प्रश्न – असं काय आहे जे पुरुष लपून अन् स्त्रिया दाखवून चालतात ?
उत्तर – पर्स (पॉकेट)

प्रश्न – असा कोणता देश आहे, तिथे फक्त मुलीच दारू पिऊ शकतात ?
उत्तर – पेरू देश

प्रश्न- मानवी डोळ्याचे वजन किती असतं ?
उत्तर- मानवी डोळ्याचे वजन फक्त 7.5 ग्रॅम आहे.
अतिरिक्त माहिती :- मानवी डोळ्याचं वजन फक्त 0.25 ounce म्हणजे 7.5 grams असतं. डोळ्याची साइज ही 0.4 cubic inch म्हणजे 6.5 cm3 असते. किती गंमत आहे ना, 75 किलोच्या मानवी शरीरात 7.5 ग्रॅमचा डोळा इतका महत्त्वाचा आहे की, तो नसेल तर संपूर्ण शरीर निरुपयोगी ठरतं.

प्रश्न – ताजमहालचे बांधकाम कधी सुरू झालं अन् कधी संपलं ?
उत्तर – ताजमहालचे बांधकाम 1632 मध्ये सुरू झालं आणि 1653 मध्ये पूर्ण झालं. ही इमारत बांधण्यासाठी तब्बल 22 वर्षांचा कालावधी लागला.

प्रश्न – कोणत्या जीवनसत्वाला सौंदर्याचा जीवनसत्व म्हणतात ?
उत्तर – व्हिटॅमिन ईला (Vitamin E)

प्रश्न – असा कोणतं पाळीव प्राणी आहे, ज्या प्राण्याच्या दुधाचं कधीच दही होतं नाही ?
उत्तर – उंट

प्रश्न – अँडव्होकेट आणि लॉयर यांच्यात काय फरक आहे ?
उत्तर – Lawyer म्हणजे ज्याच्याकडे लॉ (Law) ची डिग्री आहे, परंतु त्याला कोणत्याही न्यायालयात खटला लढण्याची परवानगी नसते. लढण्यासाठी Lawyer ला बार कौन्सिल ऑफ इंडियाची परीक्षा उत्तीर्ण करून परवाना घ्यावा लागतो, त्यानंतर तो अँडव्होकेट बनतो. अँडव्होकेट ही अशी व्यक्ती असते जिच्याकडे बार कौन्सिल ऑफ इंडियाचा परवाना (License) असतो.

प्रश्न – कोणत्या देशांकडे स्वतःच सैन्य नाही ?
उत्तर – जगात असे अनेक देश आहेत ज्यांनी सुरक्षेसाठी सैन्यापेक्षा पोलिसांवर जास्त अवलंबून आहे, त्यामुळे सुमारे 7 देशांमध्ये सैन्य नाही, ते आहेत – कोस्टा रिका, पनामा, हैती, सोलोमन बेटे, नाउरू, ग्रेनाडा आणि व्हॅटिकन सिटी.

प्रश्न – भारतातील सर्वात श्रीमंत राज्य कोणतं ?
उत्तर – 1 महाराष्ट्र GDP – 32.24 लाख कोटी / 2 ) तामिळनाडू – 19.43 लाख कोटी / 3 ) उत्तर प्रदेश – 17.05 लाख कोटी

प्रश्न : भारतातील सर्वात मोठे Museum (संग्रहालय) कुठे आहे?
उत्तर: इम्पीरियल संग्रहालय (Imperial Museum) कोलकाता

प्रश्न : पृथ्वीवर किती महासागर आहे अन् त्यांची काय आहेत नावं ?
उत्तर : पृथ्वीवर एकूण 5 महासागर आहे.
पॅसिफिक महासागर
अटलांटिक महासागर
हिंद महासागर
दक्षिण महासागर
आर्कटिक महासागर

प्रश्न : भारतीय हवामान संघटनेचे मुख्यालय कुठे आहे ?
उत्तर : दिल्ली

प्रश्न : असा कोठा देश आहे तिथे सर्वात शुद्ध पाणी आढळतं ?
उत्तर : डेन्मार्क युरोप

प्रश्न : भारतामध्ये सर्वात जास्त बालविवाह कोणत्या राज्यात होतात ?
उत्तर : झारखंड

प्रश्न : सर्वात आधी मंगळावर पोहचलेला देश कोणता ?
उत्तर : सोव्हिएत युनिअन (1971)

प्रश्न : भारताचे संविधान बनवण्यासाठी किती वेळ लागला होता ?
उत्तर : 2 वर्षे 11 महिने 17 दिवस

प्रश्न : झिरो (0) या अंकाचा शोध कोणत्या देशामध्ये लागला होता ?
उत्तर : भारत

प्रश्न : भारतातील कोणत्या शहरांमध्ये सर्वात जास्त पगार दिला जातो ?
उत्तर : बँगलोर Bangalore. (बँगलोर या शहरामध्ये प्रति व्यक्ती आय ही सरासरी 40,000 एवढी आहे)

Leave A Reply

Your email address will not be published.