Take a fresh look at your lifestyle.

कोरोनावर ‘तुळस -हळद’ ठरतंय अमृत ! असा बनवा काढा, प्रतिकारशक्ती होईल मजबूत, मधुमेहींसाठी वरदानचं…

0

शेतीशिवार टीम, 10 डिसेंबर 2021 : गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोनाच्या संसर्गाचा सर्वसामान्यांच्या जीवनशैलीवर मोठा परिणाम झाला आहे. दुसऱ्या लाटेनंतर परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली, तर कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनने (Omicron) पुन्हा एकदा संपूर्ण जगात भीती निर्माण केली आहे.

अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, ओमिक्रॉन (Omicron) हा आतापर्यंत आढळलेला सर्वात संसर्गजन्य व्हेरियंट आहे, त्यामुळे लोकांना त्यापासून विशेष संरक्षणाची आवश्यकता आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जरी ओमिक्रॉनमुळे गंभीर संसर्ग होत नसला तरी, ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे अशा लोकांमध्ये तो घातक ठरू शकतो.

डॉक्टरांचं म्हणणं आहे की, कोरोनाच्या या धोक्यापासून दूर राहण्यासाठी लोकांनी पुन्हा एकदा प्रतिकारशक्ती वाढवणारे उपाय करायला हवेत. यासाठी नियमितपणे काढ्याचं सेवन करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. तज्ञांनी सांगितलेल्या या खास काढ्याबद्दल जाणून घेऊया, ज्याच्या सेवनाने कोरोनाचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होऊ शकतो.

तुळस -हळदीचा काढा लाभदायी :-

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कोरोनाचा धोका टाळण्यासाठी सामान्य काढा काम करणार नाही. यासाठी तुळस-हळदीचा काढा घेणे विशेष फायदेशीर ठरेल. तुळस आणि हळद या दोन्हीमध्ये असलेले नैसर्गिक गुणधर्म तुम्हाला संसर्गापासून वाचवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासोबतच घशातील खवखव दूर करण्यासाठी हे पेय खूप फायदेशीर मानलं जातं.

तुळस – हळदीचा काढा कसा बनवाल ?

तुळस – हळदीचा काढा बनवण्यासाठी या गोष्टींची गरज…
अर्धा टीस्पून हळद
8-12 तुळशीची पाने
2-3 चमचे मध
3-4 लवंगा
दालचिनी

काढा तयार करण्यासाठी, एका पॅनमध्ये एक ग्लास पाणी गरम करा. आता त्यात हळद, तुळशीची पाने, लवंग आणि दालचिनी घालून मिश्रण 15 मिनिटे उकळू द्या. आता हे मिश्रण गाळून तुम्ही सेवन करू शकता…

‘हा’ काढा पिण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे…

तुळस-हळदीचा काढा पिण्याने केवळ रोगप्रतिकारशक्ती मजबूत होत नाही, तर इतर अनेक आजारांचा धोका कमी करण्यात मदत होऊ शकते.

मधुमेहाचे रुग्ण रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी या पेयाचे सेवन करू शकतात.

हे शरीरातील विषारी द्रव्ये काढून टाकण्यास आणि प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

बद्धकोष्ठता आणि लूज मोशनची समस्या दूर करण्यासाठीही या काढ्याचं सेवन फायदेशीर मानलं जातं.

सर्दी आणि घसा-दुखीपासून आराम मिळण्यासाठीही याचं सेवन केलं जाऊ शकतं.

Leave A Reply

Your email address will not be published.