शेतीशिवार टीम, 27 डिसेंबर 2021 : देशात Covid-19 विरूद्ध लसीकरण कार्यक्रमाचा विस्तार होत असून आता 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांनाही कोरोनाची लस दिली जाणार आहे. या संदर्भात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सोमवारी नोंदणी आणि लसीकरण मोहिमेबाबत नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.
सोमवारी आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन नव्या गाईडलाईन्स नुसार, 3 जानेवारीपासून, लसीकरणासाठी 15-18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांचा जन्म 2007 किंवा त्यापूर्वी झालेला असावा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला दूरचित्रवाणीद्वारे संबोधित करताना, लसीकरण मोहिमेचा विस्तार करण्याच्या सरकारच्या हालचालीची घोषणा केल्यानंतर दोन दिवसांनी नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. व्हायरसच्या अत्यंत संसर्गजन्य ओमिक्रॉन (Omicron) व्हेरियंटचा झपाट्याने प्रसार होण्याव्यतिरिक्त अनेक राज्यांमध्ये Covid-19 च्या रुग्णांत वाढ होत आहे.
15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोवॅक्सीन (Covacin) ही लस घेण्यास पात्र आहे, कारण – 15-18 वर्षे वयोगटासाठी WHO ने आणीबाणीच्या (Emergency) वापरास मान्यता दिलेली ही एकमेव लस आहे.
ZyCoV-D ही दुसरी लस 12 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या मुलांसाठी राष्ट्रीय औषध नियामकाने (National Drug Regulator) मंजूर केली आहे. हे गुजरात स्थित Zydus Healthcare ने बनवले आहे. ZyCoV-D ला अद्याप लसीकरण मोहिमेत समाविष्ट करण्यात आलेलं नाहीये.
नव्या गाईडलाईन्स जाणून घ्या…
15-18 वयोगटातील मुलांचे लसीकरण 3 जानेवारी 2022 पासून सुरू होईल. अशा लाभार्थ्यांसाठी कोव्हॅक्सिन (Covacin) ही लस देणार येणार आहे.
हेल्थकेअर वर्कर्स (HCWs) आणि फ्रंटलाइन वर्कर्स (FLWs) ज्यांना दोन डोस मिळाले आहेत, तिसरा डोस (Booster dose) 10 जानेवारी 2022 पासून देणार येणार आहे.
गंभीर आजारांनी ग्रस्त 60 वर्षे आणि त्यावरील वृद्ध व्यक्तींना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिसरा डोस किंवा बूस्टर डोस (Booster dose) दुसऱ्या डोसच्या 9 महिन्यांनंतर किंवा 39 आठवड्यांनंतर मिळणार आहे. लसीच्या दुसऱ्या डोसच्या तारखेपासून 9 महिने किंवा 39 आठवडे यासाठी आवश्यक आहे.
Co-WIN चे फीचर्स आणि तरतुदी :
आरोग्य कर्मचारी (HCWs) आणि फ्रंटलाइन वर्कर्स (FLWs) आणि 60+ गंभीर आजार असलेले नागरिक हे Co-WIN पोर्टलवर तिसऱ्या डोससाठी रजिस्ट्रेशन करू शकतात. अशा लाभार्थ्यांची पात्रता Co-WIN सिस्टम मध्ये नोंदवलेल्या दुसऱ्या डोसच्या तारखेवरवरून आधारित केली जाणार आहे.
Co-WIN अशा लाभार्थ्यांना एक एसएमएस (SMS) पाठवून डोस देय झाल्यावर तिसरा डोससाठी विचारणा करेल.
लसीकरणासाठी अपॉइंटमेंट्स ऑनलाइन किंवा ऑनसाइट बुक केल्या जाऊ शकतात.
कॉविन प्लॅटफॉर्मचे प्रमुख डॉ. आर.एस शर्मा, म्हणाले, आधार आणि इतर राष्ट्रीय ओळखपत्रांव्यतिरिक्त, मुले 1 जानेवारीपासून रजिस्ट्रेशनसाठी त्यांची इयत्ता 10 चं ओळखपत्र वापरू शकतात.