शेतीशिवार टीम, 3 डिसेंबर 2021 : प्रत्येकाने हे ऐकले असेल की आरोग्यासाठी अंकुरलेली कडधान्ये (Sprout) आणि अन्नधान्य खूप फायदेशीर असतात, लसूण आणि बटाट्यांवरील आलेले मोड यांसारख्या इतर काही अंकुरलेल्या भाज्याही फायदेशीर ठरतात की नाही ? हा प्रश्न तुमच्या मनात कधी आला असेल तर त्याचे उत्तर शोधण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. त्यामुळे मोड आलेले बटाटे आणि लसूण खाण्या पूर्वी हि माहिती नक्की वाचा.
खरं म्हटलं तर,बटाटे,कांदे,लसूण यांसारख्या भाज्यांना हिवाळ्यात पालवी फुटते.अनेकदा आपण मोड आलेला भाग कापून वेगळे करतो. नंतर उर्वरित भाग स्वयंपाकासाठी वापरला जातो, विशेषतः बटाटे.
बटाटा ही एक सामान्य भाजी आहे, जी जवळपास प्रत्येक भारतीय भाजीमध्ये 12 महिने वापरली जाते. या ऋतूत बटाट्याना मोड फुटतात, तेव्हा ते आपल्या आरोग्यासाठी खाणे फायदेशीर ठरत नाही.तर लसणाच्या बाबतीत ते पूर्णपणे उलट आहे.
सर्वप्रथम जाणून घ्या मोड आलेल्या धान्याचे फायदे ?
आयुर्वेदानुसार असे म्हटले आहे की, मोड आलेले ‘कडधान्य’ सकाळच्या नाश्त्यामध्ये एनर्जी बूस्टर म्हणून काम करतात.तरी पण,ते नियमित प्रमाणात सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. हे अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्स ए, बी, सी आणि ई मुबलक प्रमाणात आहे. मोड आलेल्या धान्यांमध्ये असलेल्या अँटी-ऑक्सिडंट्समुळे रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते.
त्याचबरोबर त्यात असलेले क्षार शरीराच्या इतर गरजाही पूर्ण करतात. त्यात फॉस्फरस,आयरन, कॅल्शियम, झिंक आणि मॅग्नेशियम यांसारखे प्रमुख क्षार आढळतात.
अंकुरलेले बटाटे खाणे हानिकारक का आहे ?
बटाटे हे सोलॅनिनचे नैसर्गिक स्त्रोत आहेत.त्यात असलेले ग्लायकोआल्कलॉइड कंपाउंड अनेक भाज्यांमध्ये आढळते पण कमी प्रमाणात, ग्लायकोआल्कलॉइड्स अनेक आरोग्य फायदे देतात, परंतु ते जास्त प्रमाणात खाल्ल्यास ते विषारी असू शकतात. जेव्हा बटाटे दीर्घकाळ टिकून राहिल्याने त्याला मोड वाढतात तेव्हा त्यातील ग्लायकोआल्कलॉइडचे प्रमाणही वाढते.
जेव्हा आपण अंकुरलेले बटाटे खातो तेव्हा त्याचे वाढलेले ग्लायकोआल्कलॉइड कंपाऊंड आपल्या शरीरात मोठ्या प्रमाणात जाते. त्यामुळे अन्नातून विषबाधा होण्याची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे मळमळ,जुलाब,पोटदुखी यांसारख्या समस्याही उद्भवू शकतात.याशिवाय,अभ्यासानुसार,गरोदरपणात मोड आलेले बटाटे खाल्ल्याने जन्मजात दोषांचा धोका वाढू शकतो.
मोड येणे (स्प्राउट्स) हे तर नैसर्गिक आहेत,आणि ते थांबवणे कठीण आहे, परंतु आपण बटाटे साठवणे टाळू शकता आणि आपल्याला आवश्यक तेवढेच खरेदी करू शकता.
अंकुरित लसूण आरोग्यासाठी फायदेशीर आहे :-
होय जर्नल ऑफ एग्रीकल्चर एंड फूड कैमिस्ट्रीमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार,अनेक महिला मोड आलेले लसूण खराब मानतात आणि ते फेकून देतात.असे करणे अत्यंत चुकीचे आहे, कारण अंकुरलेल्या लसणाचे अनेक फायदे आहेत.
रिकाम्या पोटी लसूण खाणे अप्रतिम फायदे आहेत,तरअंकुरलेले लसूण खाणे त्याहूनअधिक फायदेशीर आहे. अंकुरलेल्या लसणात ताज्या लसणापेक्षा जास्त अँटी-ऑक्सिडेंट असतात, जे आपल्या हृदयाचे आरोग्य सुधारण्याचे काम करतात.
लसणाच्या बाबतीत, लसणाला मोड येणे म्हणजे खराब होणे नाही, तर लसणाहा जगण्याचं वय वाढत.
अंकुरलेले लसूण कर्करोगापासून बचाव करण्यासाठी आयुर्वेदिक औषध आहे :-
अंकुरलेल्या लसणाला आयुर्वेदात औषधाचा दर्जा देण्यात आला आहे. वास्तविक,अंकुरलेल्या लसणात फायटोकेमिकल्स आढळतात.जे काही विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाचा प्रसार रोखण्यासाठी उपयुक्त आहेत.
लसूण हे एंटी एजिंग फूड आहे :-
जर्नल ऑफ अॅग्रिकल्चरल अँड फूड केमिस्ट्रीमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, ‘कोंब आलेल्या लसणाचे सेवन केल्याने केवळ चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर राहण्यास मदत होत नाही, तर त्यात अवयवांची झीज रोखण्याची क्षमताही असते.